Monday, March 30, 2020

प्रवासी, तसेच बेघर नागरिकांसाठी निवास व्यवस्था


अमरावती, दि. 30 : बेघर, भिक्षुक, हातमजुरी करून पोट भरणारा वर्ग, रूग्ण व त्यांचे नातेवाईक, तसेच ज्यांना निवासासाठी स्वत:चे घर नाही अशा व्यक्तींच्या निवास, भोजन आदी व्यवस्था स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने करण्यात आली  आहे. त्याबाबतचा आदेश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी जारी केला.
त्यानुसार श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ येथे हरीना फाऊंडेशन व रोटरी क्लब अमरावती यांच्या सहकार्याने व्यवस्था करण्यात आली आहे.  तेथील संपर्क व्यक्ती : श्री. मनोज राठी (मोबाईल क्र. 9422830224) व श्री. सारंग राऊत (9823104555).
त्याचप्रमाणे, ख्रिश्चन अँड मिशनरी अलायन्स, अंबापेठ, राजकमल चौकाजवळ, अमरावती येथे व्यवस्था करण्यात आली आहे. तेथील संपर्क व्यक्ती : टी. एस. लव्हाळे (मोबाईल क्र. 9545356263).
निवा-याची व्यवस्था करताना सुरक्षिततेबाबत काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
                                    000 

No comments:

Post a Comment

#अमरावती_विभाग_शिक्षक_मतदारसंघ_निवडणूक_2026 दिनांक 23 ऑक्टोबर, 2026 रोजी सकाळी 08.00 वा. ते दुपारी 16.00 वाजे पर्यंत झालेल्या अंतीम मतदानाची आकडेवारी

  # अमरावती _ विभाग _ शिक्षक _ मतदारसंघ _ निवडणूक _2026 दिनांक 23 ऑक्टोबर, 2026 रोजी सकाळी 08.00 वा. ते दुपारी 16.00 वाजे पर्यंत झालेल्या...