Thursday, March 26, 2020

कोरोना संसर्ग प्रतिबंध उपाययोजना


नागरिकांच्या सुविधेसाठी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्याकडून हेल्पलाईन सुरू

अमरावती, दि. 26 : कोरोना संसर्ग प्रतिबंधासाठी उपाययोजनांबाबत आवश्यक माहिती व नागरिकांना येणा-या अडचणींचे निराकरण करण्यासाठी पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्याकडून दूरध्वनी व व्हाटसॲप हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. काहीही अडचण आल्यास या सुविधेचा वापर नागरिकांनी करावा, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले आहे.
            कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी शासनाकडून विविध पावले उचलण्यात येत आहेत. सुरक्षितता म्हणून संचारबंदी, जमावबंदी लागू करण्यात आली आहे. या काळात नागरिकांना आवश्यक माहिती व त्यांना येणा-या अडचणींचे निराकरण करण्यासाठी ही हेल्पलाईन सुरु करण्यात आली आहे.
            त्यासाठी पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी स्वत:च्या निवासस्थानाचा 07212665573 हा लँडलाईन क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. याच क्रमांकावर व्हाटस ॲप सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासाठी   तीनजणांचे पथक नियुक्त करण्यात आले आहे. नागरिकांनाही कुठलीही अडचण आल्यास संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
                                                              000  

No comments:

Post a Comment

#अमरावती_विभाग_शिक्षक_मतदारसंघ_निवडणूक_2026 दिनांक 23 ऑक्टोबर, 2026 रोजी सकाळी 08.00 वा. ते दुपारी 16.00 वाजे पर्यंत झालेल्या अंतीम मतदानाची आकडेवारी

  # अमरावती _ विभाग _ शिक्षक _ मतदारसंघ _ निवडणूक _2026 दिनांक 23 ऑक्टोबर, 2026 रोजी सकाळी 08.00 वा. ते दुपारी 16.00 वाजे पर्यंत झालेल्या...