Tuesday, February 15, 2022

राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धेत कलावंत व नागरिकांनी सहभागी व्हावे - जिल्हाधिकारी पवनीत कौर यांचे आवाहन

 


राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धेत

कलावंत व नागरिकांनी सहभागी व्हावे

- जिल्हाधिकारी पवनीत कौर यांचे आवाहन

 

            अमरावती , दि. 15 : भारत निवडणूक आयोगाने राष्ट्रीय मतदार जागृतीसाठी विविध स्पर्धा 15 मार्चपर्यंत आयोजित केल्या आहेत. त्यात विद्यार्थी, युवक- युवती, महिला व नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी केले आहे.

 आयोगाकडून प्रश्न मंजूषा स्पर्धा (Quiz Contest), व्हिडीओ तयार करण्याची स्पर्धा (Video Making Contest), पोस्टर डिझाईन करण्याची स्पर्धा (Poster Design Contest), गाण्याची स्पर्धा (Song Contest), घोषवाक्य तयार करण्याची स्पर्धा (Slogan Contest) आदी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे.  स्पर्धेच्या विजेत्यांना रोख आकर्षक बक्षीसे भारत निवडणूक आयोगाकडून दिली जाणार आहेत.

            तरी, या स्पर्धांमध्ये अधिकाधिक नागरिकांनी भाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती कौर यांनी केले आहे. या संदर्भात सविस्तर माहिती http//:ecisveep.nic.in/contest/ येथे उपलब्ध आहे.

00000

No comments:

Post a Comment

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६

  #पुण्यश्लोक_अहिल्यादेवी_होळकर_शेतकरी_कर्जमुक्ती_योजना २०२६ #शेतकरीकर्जमुक्ती #अहिल्यादेवीहोळकर #कर्जमुक्तीयोजना2026 #FarmerWelfare #KYC #...