सायन्सकोर मैदान
येथील रुख्मिणी गणेशोत्सव मंडळात
‘आरोग्य शिबिर' आणि ‘लोकसंवाद’ कार्यक्रम
अमरावती, दि. 22 (जिमाका)
: मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष आणि जिल्हा माहिती कार्यालयाने येथील रुख्मिणी नगरातील
सायन्सकोर मैदानावरील रुख्मिणी गणेशोत्सव मंडळात सोमवार 21 सप्टेंबर रोजी ‘आरोग्य शिबिर’
आणि लोकसंवाद उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
राज्य शासनाने गणेशोत्सवाला राज्य उत्सवाचा दर्जा
दिला असून गणेशोत्सवा दरम्यान विविध गणेश मंडळांमध्ये मुख्यमंत्री सहायता निधी कक्षातर्फे
‘श्री गणेशा आरोग्याचा’ उपक्रम तसेच जिल्हा माहिती कार्यालयांच्यावतीने जनतेपर्यंत
विविध शासकीय योजनांची माहिती पोचविण्यासाठी ‘लोकसंवाद’ उपक्रम राबविण्यात येत आहे.उभय
कार्यालयांच्यावतीने आयोजित या उपक्रमात रुख्मिणी गणेशोत्सव मंडळामध्ये श्री गणरायाचे
दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या नागरिकांच्या नि:शुल्क रक्तदाब ,मधुमेह (डायबेटिस),नेत्र
आणि दंत तपासणी करण्यात आल्या. यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा सामान्य
रुग्णालय आणि डॉ. राजेंद्र गोळे आयुर्वेदिक महाविद्याल व रुग्णालयाच्या वैद्यकीय चमुने
शिबिरास भेट देणाऱ्या नागरिकांच्या वैद्यकीय तपासण्या केल्या.
मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष अमरावती जिल्हा
प्रमुख श्याम गावंडे यांनी उपस्थित नागरिकांना श्री गणेशा आरोग्याचा उपक्रमांतर्गत
जिल्हाभर राबविण्यात येत असलेल्या आरोग्य शिबिरांबद्दल तसेच आरोग्य तपासणीत आजाराचे
लक्षणे आढल्यास मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाशी संलग्नीत रुग्णालयामध्ये देण्यात येणाऱ्या
नि:शुल्क उपचाराबाबत माहिती दिली. जिल्हा माहिती
कार्यालयाचे माहिती अधिकारी रितेश भुयार यांनी मृद व जलसंधारण विभाग, कौशल्य,रोजगार
व नाविन्यता विभाग तसेच कृषी विभागाच्या योजनांबाबत आणि ‘लोकसंवाद’ उपक्रमाबाबत उपस्थित
नागरिकांना माहिती दिली.
मंगळवार, 22 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता कठोरा
रोड स्थित पोदार शाळेशेजारील जय अंबा गणेशोत्सव मंडळात ‘लोकसंवाद’ कार्यक्रमाचे आयोजन
करण्यात आले आहे. महिला व बालविकास विभाग आणि
ग्रंथालय संचालनालयातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध योजना व उपक्रमांची माहिती
या कार्यक्रमात देण्यात येणार असून या विभागांशी संबंधित नागरिकांच्या प्रश्नांचे उत्तरेही
देण्यात येणार आहेत.
०००००
No comments:
Post a Comment