जलयुक्त शिवार
आणि गाळयुक्त शिवार योजनेचा शेतकऱ्यांना दिलासा; लाभार्थ्यांची प्रतिक्रिया लोकसंवाद
उपक्रम ;
निळकंठ गणेशोत्सव मंडळात नागरिकांनी मांडले स्वानुभव
अमरावती, दि. 18 (जिमाका) : जिल्हा माहिती
कार्यालयाच्यावतीने अंबागेटमधील निळकंठ व्यायाम मंडळ गणेशोत्सवात आयोजित 'लोकसंवाद'
कार्यक्रमात शेतकरी जयंत सगणे यांनी 'जलयुक्त शिवार' योजनेच्या माध्यमातून जमिनीत वाढलेला
जलस्तर तसेच 'गाळयुक्त शिवार' योजनेद्वारे जलसाठ्यांची पाणी साठवण क्षमता वाढून शेतातील
माती सुपीकतेत झालेला सुधार याबद्दल आपला अनुभव कथन केला.
गौरव केवले यांनी छतावरील पावसाचे पाणी शोच खड्ड्यात
मुरविण्याचा केलेला अभिनव प्रयोग कथन केला.महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनातील लोकसहभागाचा
महत्त्वाचा उत्सव असलेल्या गणेशोत्सवाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना, उपक्रम
आणि धोरणात्मक निर्णयांची माहिती जनतेपर्यंत थेट पोहोचविण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाने
‘लोकसंवाद-2026’ हा विशेष जनजागृती उपक्रम शहरातील प्रदीर्घकालाची गौरवशाली परंपरा
असणाऱ्या निळकंठ व्यायाम गणेशोत्सव मंडळात आयोजित केला.
जिल्हा माहिती कार्यालयाचे माहिती अधिकारी
रितेश भुयार यांनी गणरायांच्या दर्शनासाठी आलेल्या नागरिकांना 'लोकसंवाद' कार्यक्रमाविषयी
माहिती दिली. त्यानंतर मृद व जलसंधारण विभागाचे प्रतिनिधी भूषण जावकर यांनी विभागाच्या
विविध योजना व उपक्रमांची माहिती दिली. यानंतर उपस्थित नागरिकांनी या योजनांच्या माहितीबद्दल
आणि विभागाच्या कार्याबद्दल देण्यात आलेल्या माहितीसाठी समाधान व्यक्त केले. कौशल्य,
रोजगार व उद्योजकता विभागाचे प्रतिनिधी आशिष येवले यांनी विभागाच्या वतीने बेरोजगार
युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने आयोजित करण्यात येणाऱ्या रोजगार
मेळाव्याबद्दल माहिती दिली.
दोन्ही विभागांची माहिती ऐकून घेत नागरिकांनी
आपले उत्स्फूर्त मतही मांडली. विविध योजनांच्या माध्यमातून शासन जनतेपर्यंत पोहोचते
जनतेला त्याचा फायदाही होत आहे.यावेळी लोकसंवाद कार्यक्रमात योजनांची माहिती देण्याबरोबरच
नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधण्यात आला आणि लाभार्थ्यांना संबंधित योजनांचा लाभ घेण्यासाठी
मार्गदर्शन करण्यात आले. गणरायाचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या नागरिकांसोबतच निळकंठ
व्यायाम मंडळ गणेशोत्सवाचे अध्यक्ष अनंत साऊकर,सचिव ऐश्वर्य खेडकर, मार्गदर्शक दीपक
उंडीकर, अभिनंदन पेंढारी, निळकंठ व्यायाम मंडळाचे अध्यक्ष दीपक गुल्हाने, पंकज लुंगीकर
यांनीही यावेळी विचार मांडताना गणेशोत्सवात 'लोकसंवाद' उपक्रमातमत व्यक्त करून सक्रिय
सहभाग घेतला. माहिती व जनसंपर्क विभागाद्वारे संपूर्ण राज्यभर जिल्हा माहिती कार्यालयांच्या
माध्यमातून 16 ते 24 सप्टेंबर या कालावधीत 'लोकसंवाद' उपक्रम राबविण्यात येत आहे.
००००००
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
No comments:
Post a Comment