शासकीय योजनांना लोकसहभागाचे बळ हवे; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना
जिल्ह्यात लोकसंवाद उपक्रमास सुरुवात
अमरावती, दि. 17 (जिमाका): राज्य शासनाचा मृद व जलसंधारण विभागाने माती व पाण्याच्या संवर्धनाचे विविध उपक्रम योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. कौशल्य, रोजगार व उद्योजकता विभागही तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी रोजगार मेळाव्यांच्या माध्यमातून कार्य करीत आहे. या सर्व उपक्रमांची माहिती मिळाल्याचे समाधान व्यक्त करून शहरातील ऐतिहासिक आझाद हिंद गणेशोत्सव मंडळात दर्शनासाठी आलेल्या नागरिकांनी व्यक्त करत शासनाच्या या स्तुत्य कार्यास जन सहभागाचेही बळ हवे, अशा उत्स्फूर्त भावना मांडल्या निमित्य होते जिल्हा माहिती कार्यालयाद्वारे बुधवार, 16 सप्टेंबर पासून सुरू करण्यात आलेल्या 'लोकसंवाद' उपक्रमाचे.
महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनातील लोकसहभागाचा महत्त्वाचा उत्सव असलेल्या गणेशोत्सवाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना, उपक्रम आणि धोरणात्मक निर्णयांची माहिती जनतेपर्यंत थेट पोहोचविण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाने ‘लोकसंवाद-2026’ हा विशेष जनजागृती उपक्रम शहरातील 99 वर्षांची गौरवशाली परंपरा असणाऱ्या आझाद हिंद गणेशोत्सव मंडळापासून प्रारंभ केला.
येथे गणरायांच्या दर्शनासाठी आलेल्या नागरिकांना 'लोकसंवाद' कार्यक्रमाच्या माध्यमातून मृद व जलसंधारण विभागाचे प्रतिनिधी धनंजय रोझे यांनी विभागाच्या विविध योजना व उपक्रमांची माहिती दिली. यानंतर उपस्थित नागरिकांनी या योजनांच्या माहितीबद्दल आणि विभागाच्या कार्याबद्दल देण्यात आलेल्या माहितीसाठी समाधान व्यक्त केले. कौशल्य, रोजगार व उद्योजकता विभागाचे प्रतिनिधी आशिष येवले यांनी विभागाच्या वतीने बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने आयोजित करण्यात येणाऱ्या रोजगार मेळाव्याबद्दल माहिती दिली. दोन्ही विभागांची माहिती ऐकून घेत नागरिकांनी आपले उत्स्फूर्त मतही मांडली. विविध योजनांच्या माध्यमातून शासन जनतेपर्यंत पोहोचते तसेच नागरिकांनी यात सहभागदेत या कार्याला बळ द्यावा असे विचारही मांडले.
लोकसंवाद कार्यक्रमात योजनांची माहिती देण्याबरोबरच नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधण्यात आला आणि लाभार्थ्यांना संबंधित योजनांचा लाभ घेण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले.
गणरायाचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या नागरिकांसोबतच माजी महापौर तथा आझाद हिंद गणेशोत्सव मंडळाचे उपाध्यक्ष विलास इंगोले यांनीही यावेळी विचार मांडताना गणेशोत्सवात लोकांवाद उपक्रमाद्वारे शासकीय योजनांची माहिती देण्याची संकल्पना कौतुकास्पद असल्याचे सांगितले. मंडळाचे सचिव दीपक कलंत्री, सदस्य सर्वश्री संजय मुचळंबे,प्रवीण चौधरी, अजय पुसतकर, राजेश ढोले यांनीही या लोकसंवाद कार्यक्रमात आपले मत व्यक्त करून सक्रिय सहभाग घेतला.
जिल्ह्यात या उपक्रमाची सुरुवात आझाद हिंद गणेशोत्सव मंडळापासून झाली. उपक्रमाच्या दुसऱ्या दिवशी गुरुवार 17 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता रेवसागाव येथील राजश्री प्रतिष्ठान गणेशोत्सव मंडळात लोकसंवाद उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.या उपक्रमांतर्गत कृषी विभाग आणि सहकार व पणन विभागातर्फे राबविण्यात येत असलेल्या विविध योजना व उपक्रमांची माहिती देण्यात येणार आहे.
000000









No comments:
Post a Comment