लोकसंवाद; जय
अंबा गणेशोत्सव मंडळात नागरिकांनी घेतली बालविवाह प्रतिबंधक प्रतिज्ञा
चाईल्ड हेल्प लाईन, वन स्टॉप सेंटर व दत्तक विधान पद्धतीची
देण्यात आली माहिती
ग्रंथ भेट देऊन साजरा व्हावा वाढ दिवस ;पालकांनी स्वतः
दररोज वाचनातून पाल्यांना लावावी वाचनाची गोडी
अमरावती, दि.२४ (जिमाका): जिल्ह्यात यावर्षी २२ बाल विवाह रोखण्यात प्रशासनाला यश आले
आहे. समाजातून बालविविहाच्या अनिष्ठ चाली-रितीस घालविण्यासाठी लोक सहभागाचे आवाहन करून
'बालविवाहाच्या कोणत्याही कार्यात आम्ही सहभागी होणार नाही तसेच बालविवाहास प्रत्यक्ष
किंवा अप्रत्यक्षपणे मदत करणार नाही....' अशी शपथ बुधवारी 'लोकसंवाद' कार्यक्रमात जिल्हा बाल संरक्षण अधिकारी पंकज डबले यांनी जय
अंबा गणेशोत्सव मंडळात उपस्थित नागरिकांना दिली.
शहरातील कठोरा रोड स्थित
पोदार शाळेशेजारील जय अंबा अपार्टमेंटच्या जय अंबा गणेशोत्सव मंडळात जिल्हा माहिती
कार्यालयाने जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय आणि शासकीय विभागीय ग्रंथालय कार्यालयाच्या
संयुक्त विद्यमाने लोकसंवाद कार्यक्रम आयोजित केला.
बालविवाह प्रतिबंधक अधिनियम
२००६ ची माहिती यावेळी देण्यात आली. अमरावती जिल्ह्यात ग्रामीण व शहरी भागात या अधिनियमाची
करण्यात येत असलेल्या अंमलबजावणीबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. परिणामी यावर्षी
जिल्ह्यात २२ बाल विवाह समुपदेशातून सोडविण्यात आल्याचे सांगण्यात आले. समुपदेशन व
काही प्रकरणात एफआयआरही करण्यात येतो. उपस्थित महिला व पुरुषांनी या विषयाबाबत विचारलेल्या
प्रश्नांबाबत समाधानकारक उत्तर देण्यात आली.
चाईल्ड हेल्प लाईनच्या
माध्यमातून हरवलेल्या व भरकटकेल्या मुलांना त्यांच्या कुटुंबीयापर्यंत पोचविण्याची
करण्यात येत असलेली कार्यवाही व त्याबाबतची कार्यपद्धती, हिंसाचाराने त्रस्त किंवा
संकटग्रस्त महिलांना एकाच छताखाली सर्व प्रकारची मदत मोफत देणारी 'वन स्टॉप सेंटर'
योजना, लेक लाडकी योजना,दत्तक विधान अंतर्गत मुल दत्तक घेताना वापरण्यात येणारी कार्य
पद्धती, महिला स्वाधारगृहे, बालगृह, महिला राज्य गृह आदीबाबत यावेळी जिल्हा बाल संरक्षण
अधिकारी अजय डफले, चाईल्ड हेल्पलाईन समन्वयक पंकज शिनगारे,हेल्प लाईनचे समुपदेशक अजय
देशमुख, परिविक्षा अधिकारी मनोज श्रीखंडे ,केस वर्कर वर्षा देशमुख (अचलपूर तालुका)
आणि शिला धर्माळे यांनी माहिती दिली.
शासकीय विभागीय ग्रंथालयाचे
जिल्हा ग्रंथालय अधिकारी संजय बनसोड यांनी ग्रंथालय संचालनालयातर्फे राज्यात राबविण्यात
येणारे ग्रंथालये व विविध योजनांची माहिती दिली. वाढदिवसाला भेटवस्तू किंवा पुष्पगुच्छ
देण्याऐवजी पुस्तक भेट द्यावी. तसेच घरामध्ये दररोज पालकांनी पुस्तक वाचावे त्याचे
संस्कार लहान मुलांवर होऊन त्यांच्यामध्ये वाचनाची आवड निर्माण होईल व वाचन संस्कृतीची
वृद्धी होईल, असे श्री. बनसोड यांनी सांगितले.चांदूर बाजारचे तालुका कृषी अधिकारी प्रवीण
मोहोड यांनी यावेळी कृषी विभागाच्या विविध योजनांबद्दल उपस्थितांना मार्गदर्शन केले.
महाराष्ट्र शासनाने गणेशोत्सवाला
राज्य उत्सवाचा दर्जा दिला आहे. यानिमित्ताने माहिती व जनसंपर्क विभाग गणेशोत्सव काळात
गणेश मंडळांना भेट देणाऱ्या नागरिकांना 'लोकसंवाद' उपक्रमाच्या माध्यमातून शासनाच्या
विविध विभागांच्या योजनांची माहिती देण्याचा उपक्रम राज्यभर राबवित आहे. माहिती देतानाच
संबंधित विभागाच्या योजनांबाबत नागरिकांना येणाऱ्या अडचणी व योजनांबाबत प्रश्नोत्तरे
असे या कार्यक्रमाची रूपरेषा असल्याचे सांगून अमरावती जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने
जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमाबाबत माहिती अधिकारी रितेश भुयार यांनी
यावेळी प्रास्ताविक केले.
०००००
#लोकसंवाद
#गणेशोत्सव2026




.jpeg)

No comments:
Post a Comment