शेतकरी महिलांना शेतकरी प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन
अमरावती, दि.२२:
महाराष्ट्र राज्याने महिला सक्षमीकरण करण्याच्या दृष्टीने 'महाराष्ट्र महिला शेतकरी
सक्षमीकरण अधिनियम २०२६' लागू केला आहे. त्याअंतर्गत पात्र महिलांना शेतकरी प्रमाणपत्र
प्रदान करण्यात येणार असुन त्याद्वारे त्यांना अधिकृतपणे महिला शेतकरी म्हणून मान्यता
मिळेल, तसेच शासनाच्या विविध कृषि योजना, कर्ज, विमा, अनुदाने, प्रशिक्षणे, तांत्रिक
मार्गदर्शनाचा लाभ सुलभपणे मिळु शकेल.
शेतीमध्ये काम
करणा-या महिला, दुग्धव्यवसाय, शेळीपालन, कुक्कुटपालन, रेशीम उद्योग, मधुमक्षिकापालन,
भाजीपाला फळबाग लागवड व इतर शेतीपूरक व्यवसाय करणा-या महिलांना लाभ घेता येईल. अशा
पात्र महिलांनी त्वरीत महिला शेतकरी पोर्टलवर https://uat-mahakrishi.mahaitgov.in/mahila-shetkari-service
आवश्यक माहिती भरुन ऑनलाईन अर्ज सादर करावा. ज्या महिला सध्या शेतकरी आहेत, त्यासुध्दा
शेतकरी प्रमाणपत्र प्राप्त करु शकतात. पोर्टलवर अर्ज करण्याची सुविधा अत्यंत सुलभ आहे.
पोर्टलवर अर्ज केलेल्या महिलांना २ ऑक्टोबर २०२६ रोजी होणा-या ग्रामसभेमध्ये पात्रता
तपासुन त्यानंतर प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. तरी अधिकाधिक महिलांनी पोर्टलवर अर्ज
करुन प्रमाणपत्र प्राप्त करुन घ्यावे. अधिक माहितीसाठी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी,
उपविभागीय कृषि अधिकारी अथवा तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन
विभागीय कृषि सहसंचालक गणेश घोरपडे यांनी केले आहे.
00000
#अमरावती

No comments:
Post a Comment