Saturday, September 26, 2026

जनगणनेचे 'संक्षिप्त घरयादी'बाबत प्रशिक्षण संपन्न






जनगणनेचे 'संक्षिप्त घरयादी'बाबत प्रशिक्षण संपन्न

अमरावती, दि. 26 (जिमाका) : जनगणना 2027 च्या दुसऱ्या टप्प्याच्या पूर्वतयारीसाठी जिल्ह्यात संक्षिप्त घरयादी आणि गणना गट तयार करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. हे काम अधिक प्रभावीपणे करण्यासाठी  जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे शनिवारी, 26 सप्टेंबर रोजी प्रशिक्षण पार पडले.

जनगणना 2027 अंतर्गत पहिल्या टप्प्याचे यशस्वी पूर्ततेनंतर जनगणनेचा दुसरा टप्पा लोकसंख्या गणना यास सुरुवात होणार आहे. सदर टप्प्याची पूर्वतयारी म्हणून संक्षिप्त घर यादी व गणना गट तयार करण्यात येणार आहे. या प्रक्रियेस सुरुवात झालेली असून जिल्हास्तरावर प्रशिक्षण घेण्यात आले. सदर प्रशिक्षणास जनगणना संचालनालयाचे सहाय्यक संचालक प्रवीण भगत आणि ऋषिकेश पाथरे प्रशिक्षक म्हणून उपस्थित होते.

दुसरा टप्पा हा व्याप्त स्वरूपाचा आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रगणक, पर्यवेक्षक आणि जिल्ह्यातील यंत्रणा कामी लागणार आहे. जिल्ह्यातील सर्व तहसीलदार, मुख्याधिकारी व त्यांची जनगणना संबंधित यंत्रणा, तसेच अमरावती महानगरपालिका येथील जनगणनेशी संबंधित यंत्रणा सदर प्रशिक्षणास प्रशिक्षक म्हणून उपस्थित होते.

जनगणना 2027 दुसऱ्या टप्प्याकरीता जिल्ह्यातील जनगणना यंत्रणा सज्ज झाली आहे. जनगणना 2027 दुसरा टप्पा पूर्वतयारीबाबतचे प्रशिक्षण प्रधान जनगणना अधिकारी तथा जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या मार्गदर्शनात जिल्हा जनगणना अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे  यांचे अध्यक्षतेखाली पार पडले.

कार्यक्रमासाठी जणगणना कक्षाच्या सहायक महसूल अधिकारी राधिका देशमुख, महसूल सहायक प्रियंका राऊत, राहूल कोठे, चेतना वानखडे यांनी सहकार्य केले.

0000

 

No comments:

Post a Comment

दुष्काळग्रस्त २६५ तालुक्यांना शासनाचा दिलासा ! दुष्काळाशी लढण्यासाठी राज्य शासन सज्ज !

  दुष्काळग्रस्त २६५ तालुक्यांना शासनाचा दिलासा ! दुष्काळाशी लढण्यासाठी राज्य शासन सज्ज ! #दुष्काळ   #शेतकरी  #FarmerWelfare