जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे विशेष अभियान
प्रलंबित अर्जदारांसाठी त्रुटीपूर्तता शिबिर, मार्गदर्शन सत्रे
अमरावती, दि. 23 (जिमाका) : जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीतर्फे सेवा संकल्प अभियानात शैक्षणिक प्रवेश आणि प्रलंबित अर्जांच्या त्रुटीपूर्ततेसाठी विशेष शिबिर, वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे.
शैक्षणिक वर्ष 2026-2027 मध्ये अकरावी आणि विज्ञान शाखेत बारावी, तसेच विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतलेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अर्ज केले आहेत, मात्र ज्यांचे अर्ज त्रुटीअभावी समितीकडे प्रलंबित आहेत, अशा अर्जदारांसाठी हे शिबिर घेण्यात येत आहे.
अर्जदारांनी आवश्यक त्रुटींची पूर्तता करण्यासाठी अमरावती येथील कार्यालयात प्रत्यक्षात उपस्थित राहण्यासाठी दि. 25 सप्टेंबर, दि. 5 ऑक्टोबर, दि. 8 ऑक्टोबर, दि. 12 ऑक्टोबर या तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत. तसेच तालुक्यातील सर्व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयांतील मुख्याध्यापक व शिक्षकांसाठी दि. 29 सप्टेंबर आणि दि. 6 ऑक्टोबर रोजी वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे.
जात वैधता प्रमाणपत्राबाबत विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी दि. 7 ऑक्टोबर रोजी शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था, अमरावती आणि दि. 13 ऑक्टोबर रोजी श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयात मार्गदर्शन शिबिरे आयोजित करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व विद्यार्थी व पालकांनी या मार्गदर्शन शिबिरांचा आणि त्रुटीपूर्तता शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या उपायुक्त तथा सदस्य जया राऊत यांनी केले आहे.
00000

No comments:
Post a Comment