Thursday, February 17, 2022

वडाळी तलावानजिक निसर्ग पर्यटन क्षेत्रात स्व. बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यान निर्माण व्हावे पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांचे उपमुख्यमंत्री, तसेच पर्यटन मंत्र्यांना निवेदन

 


वडाळी तलावानजिक निसर्ग पर्यटन क्षेत्रात स्व. बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यान निर्माण व्हावे

पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांचे उपमुख्यमंत्री, तसेच पर्यटन मंत्र्यांना निवेदन

 

अमरावती, दि. 17 : अमरावती महापालिका क्षेत्रातील वडाळी तलावाचे सौंदर्यीकरण व निसर्ग पर्यटन क्षेत्र निर्मितासाठी आवश्यक अनुदान उपलब्ध करून द्यावे, तसेच या स्थळाला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यान असे नाव देण्यात यावे, अशी मागणी राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

अमरावती महानगरपालिका क्षेत्रात वडाळी तलावाचे सौंदर्यीकरण व निसर्ग पर्यटन क्षेत्र निर्माण करण्यासाठी महापालिकेतर्फे जिल्हाधिका-यांमार्फत प्रस्ताव महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडे सादर करण्यात आला होता. त्यानुसार शासन निर्णयानुसार 25 कोटी मंजूर करण्यात आले. तथापि, शासनाकडून अद्यापपर्यंत निधी प्राप्त झालेला नाही. तो उपलब्ध करून द्यावा जेणेकरून या स्थळाच्या विकासकामांना चालना मिळेल, अशी विनंती पालकमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री श्री. पवार व पर्यटन मंत्री श्री. ठाकरे यांच्याकडे केली आहे.

प्रस्तावित वडाळी तलावाचे सौंदर्यीकरण व निसर्ग पर्यटन स्थळाला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे असे नाव देऊन आगामी अधिवेशनात त्याबाबत घोषणा होण्याची विनंती पालकमंत्र्यांनी केली आहे.

00000

No comments:

Post a Comment

#पुण्यश्लोक_अहिल्यादेवी_होळकर_शेतकरी_कर्जमुक्ती_योजना २०२६

  #पुण्यश्लोक_अहिल्यादेवी_होळकर_शेतकरी_कर्जमुक्ती_योजना २०२६ #शेतकरीकर्जमुक्ती #अहिल्यादेवीहोळकर #कर्जमुक्तीयोजना2026 #FarmerWelfare #...