Tuesday, June 7, 2022

प्रवर अधीक्षक कार्यालयात 28 जुनला डाक अदालत

 

प्रवर अधीक्षक कार्यालयात 28 जुनला डाक अदालत

अमरावती, दि.7:  टपाल विभागाच्या अमरावती प्रवर अधीक्षक कार्यालयातर्फे डाक अदालत 28 जुनला दुपारी चार वाजता होणार आहे.

विभागातील टपाल विभागाच्या कामासंबंधी जसे की, स्पीड पोस्ट, काऊंटर सेवा, पार्सल सेवा, बचत बँक याबाबत ज्या तक्रारींचे सहा आठवड्यांच्या आत निराकरण झाले नसेल, त्यावर अदालतीत निर्णय होईल. संबंधितां 13 जुनपूर्वी तक्रारी प्रवर अधीक्षक कार्यालयाला पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 17-10-2025

                                                        जिल्हा महिला लोकशाही दिन येत्या सोमवारी अमरावती, दि. 17 (जिमाका) : जिल्हा महिला लोकश...