Sunday, July 10, 2022

अमरावती विभागातील विविध प्रकल्पांतील जलाशय पातळी

 

अमरावती विभागातील विविध प्रकल्पांतील जलाशय पातळी

अमरावती दि.10 (विमाका) : विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाने दि. 10 जुलै 2022 रोजी सकाळी 7 वाजता दिलेल्या माहितीनुसार अमरावती प्रादेशिक विभागातील मोठ्या व मध्यम प्रकल्पांतील दैनिक जलाशय पातळी व पाणीसाठा अहवाल खालीलप्रमाणे.

अहवालानुसार, पूर्णा मध्यम प्रकल्पात आज दिनांक 10 रोजी जलाशय पातळी 447.09 मी. आहे. अकोला येथील घुंगशी बॅरेज  प्रकल्पात आजची जलाशय पातळी 254.00 मी. आहे.

विभागातील मोठ्या प्रकल्पातील जलाशय पातळी खालीलप्रमाणे (मी.मध्ये)

अमरावती जिल्ह्यातील उर्ध्व वर्धा (339.20), यवतमाळ जिल्ह्यातील पुस प्रकल्प (390.03), अरुणावती (325.91), बेंबळा (266.15), अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा (342.21), वान (398.53), बुलढाणा जिल्ह्यातील नळगंगा (288.78), पेनटाकळी (555.25), खडकपूर्णा (516.96).

मध्यम प्रकल्पातील जलाशय पातळी खालीलप्रमाणे (मी.मध्ये)

अमरावती जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पातील जलाशय पातळी शहानूर (438.90), चंद्रभागा (498.10), पूर्णा (447.09), सपन (504.60), पंढरी (424.76), गर्गा (344.50), यवतमाळ जिल्ह्यातील अधरपूस (303.50), सायखेडा (272.00), गोकी (312.86), वाघाडी (315.40), बोरगांव (315.95), नवरगांव (252.50), अकोला जिल्ह्यातील  निर्गुणा (384.55), मोर्णा (361.70), उमा (339.00), घुंगशी बॅरेज (254.00), वाशिम जिल्ह्यातील अडाण (376.71), सोनल (448.70), एकबुर्जी (144.05), बुलडाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा (400.50), पलढग (398.70), मस (322.20), कोराडी (545.00), मन (370.60), तोरणा (402.15), उतावळी (366.00) आहे.  

 

000000

No comments:

Post a Comment

बँकांनी उद्योगांना कर्जवाटप करताना सकारात्मक रहावे - जिल्हाधिकारी आशिष येरेकर

बँकांनी उद्योगांना कर्जवाटप करताना सकारात्मक रहावे    - जिल्हाधिकारी आशिष येरेकर *उद्दिष्ट प...