Thursday, December 22, 2022

मध्यप्रदेशचे राज्यपाल मंगूभाई पटेल आज अमरावतीत

 

मध्यप्रदेशचे राज्यपाल मंगूभाई पटेल आज अमरावतीत

अमरावती, दि. 22 : मध्यप्रदेशचे राज्यपाल मंगूभाई पटेल दि. 23 व 24 डिसेंबर या दोन दिवसीय अमरावती दौऱ्यावर येत आहेत. उद्या शुक्रवार, दि. 23 डिसेंबर रोजी सायंकाळी 6.30 वाजता नागपूर येथून अमरावती शासकीय विश्रामगृह, शिवनेरी कॉलनी येथे त्यांचे आगमन होईल. व रात्री तेथे मुक्काम करतील.

शनिवार, दि. 24 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता डॉ. पंजाबराव देशमुख विदर्भ प्रशासकीय व विकास प्रशिक्षण प्रबोधीनी येथील सभाकक्षात आयोजित सीमावर्ती जिल्ह्याच्या संयुक्त बैठकीस उपस्थित राहतील. बैठकीनंतर दुपारी 2.30 वाजता ते मध्यप्रदेश, भोपाळकडे प्रयाण करतील.

*****

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 10.06.2026

  शुक्रवारी जागतिक बाल कामगार प्रथाविरोधी दिन अमरावती, दि. 10 (जिमाका) : बालमजुरी या अनिष्ठ प्रथेविरूद्ध विस्तृत प्रमाणात जनजागृती करणे आवश्...