Wednesday, December 21, 2022

राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन उत्साहात साजरा

 




राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन उत्साहात साजरा

अमरावती, दि. 21 : अपारंपारिक ऊर्जा स्त्रोतांचा वापर वाढविणे व ऊर्जा संवर्धन करण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन सप्ताह दि. 14 ते 20 डिसेंबर 2022 या दरम्यान अमरावती विभागात साजरा करण्यात आला. ऊर्जा संवर्धनाबाबत नागरिकांचा सहभाग व जनजागृती तसेच भविष्यात निर्माण होऊ घातलेल्या ऊर्जा संकटाबाबत जनतेमध्ये जागृती करणे तसेच अपारंपारिक ऊर्जा स्त्रोतांच्या वापराविषयी प्रबोधन करण्यासाठी महाऊर्जा विभागीय कार्यालयाचे विभागीय महाव्यवस्थापक प्रफुल्ल तायडे यांच्या हस्ते ऊर्जा संवर्धन रथाला हिरवी झेंडी दाखवून ऊर्जा संवर्धन रथ जनजागृतीसाठी मार्गस्थ करण्यात आला.

ऊर्जा संवर्धन जागृती कार्यक्रमांतर्गत महाऊर्जा व ग्रीनगेज फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने अमरावती जिल्ह्यातील शासकीय तंत्रनिकेतन, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ तसेच शारदा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम राबविण्यात आला. ऊर्जा संवर्धन जनजागृती कार्यक्रमाला शिक्षक, कर्मचारी तसच विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

*****


No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 10.06.2026

  शुक्रवारी जागतिक बाल कामगार प्रथाविरोधी दिन अमरावती, दि. 10 (जिमाका) : बालमजुरी या अनिष्ठ प्रथेविरूद्ध विस्तृत प्रमाणात जनजागृती करणे आवश्...