Friday, December 16, 2022

ग्रामपंचायतींचे कर वसुली शिबिर 31 जानेवारीपर्यंत सुरु मालमत्ता कर व पाणीपट्टी कर वेळेत भरण्याचे आवाहन



 ग्रामपंचायतींचे कर वसुली शिबिर 31 जानेवारीपर्यंत सुरु

 मालमत्ता कर व पाणीपट्टी कर वेळेत भरण्याचे आवाहन

 

अमरावती, दि. 16 : जिल्हा परिषदेमार्फत 841 ग्रामपंचायतींमध्ये 31 जानेवारी 2023 पर्यंत मालमत्ता कर व पाणीपट्टी कर वेळेत भरावा, यासाठी वसुली शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. गावकरी तसेच खातेदारांनी ग्रामपंचायतीचा मालमत्ता कर व पाणीपट्टी कर वेळेत भरुन वसुलीसाठी सहकार्य करण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले आहे.

जिल्हा परिषदेमार्फत ग्रामपंचायत स्तरावरील पाणी कर व मालमत्ता कर वसुली शिबिर विस्तार अधिकारी (पंचायत), विस्तार अधिकारी (कृषी) पथक प्रमुख तथा ग्रामपंचायत सचिव असे गट नेमून 841 ग्रामपंचायतींसाठी तारीखनिहाय कर वसुली शिबिराचे नियोजन करण्यात आले आहे. शंभर टक्के कर वसूली होण्याच्या दृष्टीने वसुली शिबिर लावण्यात आले असून येथे मोठ्या प्रमाणात मालमत्ता कर व पाणीपट्टी कर वसुली सुर असल्याचे जिल्हा परिषदेमार्फत कळविण्यात आले आहे.

***

No comments:

Post a Comment

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक मुंबई, दि. ९ : अमरावती वन विभागातील ...