Wednesday, December 7, 2022

वाळूगटांच्या ‘डीएसआर’बाबत आक्षेप, सूचना पाठविण्याचे आवाहन

वाळूगटांच्या ‘डीएसआरबाबत

आक्षेप, सूचना पाठविण्याचे आवाहन

 

अमरावती, दि. 7 : जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे अमरावती जिल्ह्यातील वाळूगटांबाबत राज्यस्तरीय पर्यावरण समितीची अनुमती मिळण्यासाठी अर्ज सादर करण्यात येणार आहे. 

जिल्ह्यातील वाळूगट निश्चित करण्यात आले असून, त्याचा प्रारुप जिल्हा सर्वेक्षण अहवाल (डिस्ट्रिक्ट सर्व्हे रिपोर्ट) तयार करण्यात आला आहे. केंद्र शासनाच्या पर्यावरण, वने व वातावरण बदल मंत्रालयाच्या सूचनेनुसार हा प्रारुप अहवाल नागरिकांच्या माहितीसाठी व अभिप्राय नोंदविण्यासाठी www.amavati.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे.

            या अहवालातील रेतीघाटांच्या लिलावाच्या अनुषंगाने कोणताही आक्षेप, अभिप्राय, सूचना असल्यास आपले म्हणणे तीन प्रतींसह जिल्हा खनिकर्म विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती येथे किंवा dmoamravati१@gmail.com या मेलवर 30 दिवसाच्या आत नोंदवावे, असे आवाहन जिल्हा खनिकर्म अधिकारी डॉ. इम्रान शेख यांनी केले आहे.

000000


No comments:

Post a Comment

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #राज्यसरकार

  ‘ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ ’ #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #राज्यसरकार