Wednesday, September 20, 2023

नोकरी करणाऱ्या महिलांच्या वसतीगृहासाठी स्वयंसेवी संस्थामार्फत अर्ज आमंत्रित

 नोकरी करणाऱ्या महिलांच्या वसतीगृहासाठी स्वयंसेवी संस्थामार्फत अर्ज आमंत्रित

 

अमरावती, ‍दि. 18 : शहरी भागात नौकरी करणाऱ्या एकल महिला, अविवाहीत विधवा घटस्फोटीत, विभक्त, पती बाहेरगावी असलेल्या महिलांना नौकरीच्या ठिकाणी सुरक्षित आणि सोयीस्कर पध्दतीने निवासाच्या व्यवस्थेकरिता शासनामार्फत ‘नौकरी करणाऱ्या महिलांचे वसतिगृह’ योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत वसतीगृहासाठी स्वयंसेवी संस्थाकडून प्रस्ताव मागविण्यात आले असून इच्छुक संस्थानी शुक्रवार दि. 22 सप्टेंबरपर्यंत अर्ज सादर करावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी केले आहे.

 

महिला व बाल विकास विभागाच्या मिशन शक्ती अंतर्गत संबल आणि सामर्थ्यं या दोन उपयोजना राबविण्यात येत आहेत. योजनतील सामर्थ्य उपयोजनेत नौकरी करणाऱ्या महिलांकरीता सखी निवास या घटक योजनेचा समावेश आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी स्वयंसेवी संस्थाकडून प्रस्ताव मागविण्यात येत आहे. इच्छुक स्वयंसेवी संस्थांनी विहित नमुन्यातील अर्जासाठी तसेच अधिक माहितीसाठी व सर्वसाधारण सुचना साठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, दत्तात्रय सदन, दसरा मैदान रोड भूतेश्वर चौक देशपांडेवाडी, अमरावती येथे किंवा दुरध्वनी क्रमांक 0721-2990412 वर संपर्क साधावा. इच्छुक स्वयंसेवी संस्थानी आवश्यक कागदपत्रासह 5 प्रतीमध्ये प्रस्ताव कार्यालयात सादर करावा. मुदती नंतर येणाऱ्या प्रस्तावांचा विचार केला जाणार नाही.

000000

No comments:

Post a Comment

विशेष लेख : वाचन प्रेरणा दिन : पुस्तकांच्या पलीकडे विवेकाचा शोध!

  विशेष लेख : वाचन प्रेरणा दिन : पुस्तकांच्या पलीकडे विवेकाचा शोध!   माहितीच्या महासागरात ज्ञानाचा दीप आणि मतांच्या कोलाहलात विवेकाचा ...