Wednesday, September 13, 2023

केकतपूर येथे आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

 केकतपूर येथे आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

          अमरावती, दि. 12:  विभागीय संदर्भ सेवा रूग्णालय व्दारे महात्मा ज्योतीराव फुले जनआरोग्य सेवा अंतर्गत गुरुवार दि. 7 सप्टेंबर रोजी केकतपूर येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले. यावेळी विविध आजारांचे तपासण्या व मार्गदर्शन करण्यात आले.

 

 वैद्यकीय अधिक्षक डॉ. अमोल नरोटे व विशेष कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश मेंढे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले. शिबीरामध्ये बालरोग, कीडनीचे आजार, लघवीशी संबंधित आजार, हद्यरोग, कर्करोग, मेदुंशी संबंधित आजार, जळीत प्लॉस्टीक सर्जरी, मधुमेह, उच्च रक्तदाब इत्यादी आजाराचे तपासण्या करून पुढील उपचारासाठी संदर्भित करण्यात आले. तपासणीसाठी डॉ. सपना गुप्ता, नेहा हिवराळे, रेशमा गोरठे, भुपेंद्र जेवडे, अभिजीत शुक्ला, दिपक शर्मा, समुदाय आरोग्य अधिकारी केकतपूर, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, आशा सेविका आदी उपस्थित होते.

 

00000


No comments:

Post a Comment

भरती परीक्षा अधिक सुरक्षित,पारदर्शक,विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी गठीत उच्चस्तरीय टास्क फोर्स १७ सप्टेंबर रोजी #अमरावती येणार

  भरती परीक्षा अधिक सुरक्षित,पारदर्शक,विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी गठीत उच्चस्तरीय टास्क फोर्स १७ सप्टेंबर रोजी #अमरावती येणार आह...