Wednesday, September 13, 2023

लोकसेवा हक्क अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी करा-आयुक्त रामबाबू नारुकुल्ला

 लोकसेवा हक्क अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी करा-आयुक्त रामबाबू नारुकुल्ला

      अमरावती, दि. 13 : नागरिकांना सेवेचा हक्क देणारा क्रांतीकारी कायदा म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 होय. नागरिकांना विहित कालमर्यादेत शासकीय विभागांच्या अधिसूचित सेवा मिळविण्यासाठी कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी सर्व विभाग प्रमुखानी प्रयत्न करावे, असे आवाहन अमरावती विभागाचे राज्य सेवा हक्क आयुक्त रामबाबू नारुकुल्ला यांनी केले.

      लोकसेवा हक्क अधिनियम 2015 संदर्भात सर्व विभाग प्रमुखांची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी सौरभ कटियार, मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा, अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, निवासी उपजिल्हाधिकारी विवेक घोडके,  सर्व विभाग प्रमुख, उपविभागीय अधिकारी, तहसिलदार आदी उपस्थित होते. 

     आयुक्त श्री. नारुकुल्ला यांनी महाराष्ट्र लोकसेवा अधिनियम, 2015 बाबत मार्गदर्शन केले व सर्व विभाग प्रमुखांचा आढावा घेतला. शासनाची प्रतिमा उंचाविण्यासाठी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी. तसेच सर्वसामान्यांना विहित कालावधीत सेवा उपलब्ध करुन द्यावे, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. 

00000

No comments:

Post a Comment

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #राज्यसरकार