Wednesday, September 27, 2023

ईद ए मिलादनिमित्त शुक्रवारी सुट्टी

 ईद ए मिलादनिमित्त शुक्रवारी सुट्टी

अमरावती, दि. 27 : अनंत चतुर्दशी निमित्त गणेश विसर्जन आणि ईद ए मिलादचा सण एकाच दिवशी म्हणजे उद्या गुरुवारी(दि.28) होणार आहे. या कालावधीत गर्दी आणि मिरवणुकांचे योग्य व्यवस्थापन करणे पोलीस प्रशासनास शक्य व्हावे म्हणून ईद ए मिलाद या सणाची सुट्टी गुरुवार दि. 28 ऐवजी शुक्रवार दि. 29 रोजी शासकीय सुट्टी जाहीर झाल्याचे आदेश सामान्य प्रशासनाकडून निर्गमित झाले आहे.

            अनंत चतुर्दशीनिमित्त राज्याच्या विविध भागात गणेश विसर्जन मिरवणुका आणि ईद ए मिलादनिमित्त मिरवणुका काढण्यात येत असतात. दोन्ही सणांमुळे एकाच दिवशी निघणाऱ्या मिरवणुकांमुळे पोलीस यंत्रणांवर ताण येण्याची शक्यता लक्षात घेऊन शुक्रवार दि. 29 सप्टेंबर रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली असून दि. 28 सप्टेंबर रोजी सर्व शासकीय कार्यालय नियमित सुरु राहतील.

00000

No comments:

Post a Comment

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #राज्यसरकार