Wednesday, July 19, 2023

नागरी सेवा परीक्षेच्या पूर्व प्रशिक्षणासाठी 14 ऑगस्टपर्यंत अर्ज करावा

 

नागरी सेवा परीक्षेच्या पूर्व प्रशिक्षणासाठी 14 ऑगस्टपर्यंत अर्ज करावा

            अमरावती, दि. 19:  केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षा -2024 च्या पूर्व प्रशिक्षणाच्या विनामूल्य प्रशिक्षणासाठी 14 ऑगस्ट 2024 पर्यंत ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करण्याचे आवाहन अमरावती येथील भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्राच्या संचालिका डॉ. संगीता पकडे (यावले) यांनी केले आहे.

या केंद्रातील प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा ऑफलाईन पध्दतीने राज्यस्तरावरुन  घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी निर्धारित अटींची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम मुदत 14 ऑगस्ट व परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम मुदत 15 ऑगस्टपर्यंत आहे. प्रवेश परीक्षा रविवार, दि. 27  ऑगस्ट 2023 रोजी ऑफलाईन पध्दतीने घेण्यात येणार आहे. परीक्षेचा कालावधी सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत राहील. याची नोंद संबंधित विद्यार्थ्यांनी घ्यावी, असे भारतीय प्रशासकीय पूर्व प्रशिक्षण केंद्रामार्फत कळविण्यात आले आहे. यासंबंधी सविस्तर माहिती, जाहिरात, परीक्षेचा अभ्यासक्रम, अर्ज तसेच परीक्षेसंबंधी इतर सूचना www.siac.org.in  या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

00000

No comments:

Post a Comment

अमरावती येथे मंगळवारी होणार मतमोजणी मतमोजणी केंद्रात १७५ अधिकारी, कर्मचारी नियुक्त; पोलीस बंदोबस्तही चोख

  #अमरावती_विभाग_शिक्षक_मतदारसंघ_निवडणूक_2026 अमरावती येथे मंगळवारी होणार मतमोजणी मतमोजणी केंद्रात १७५ अधिकारी, कर्मचारी नियुक्त; पोलीस बंदो...