Friday, July 14, 2023

ग्रामीण भागात कलम 37 (1) व (3) लागू

 

ग्रामीण भागात  कलम 37 (1) व (3) लागू

            अमरावती, दि. 14 :  जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलीस अधीक्षक (ग्रामीण), अमरावती  यांनी महाराष्ट्र पोलिस कायद्याचे कलम 37 (1) व (3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे.

सदर प्रतिबंधात्मक आदेश जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावा, याकरिता पोलिस आयुक्तालय परिक्षेत्र वगळून अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागात लागू करण्यात आला असून दि. 16 ते 30 जुलै 2023 च्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहील. या कलमाचा भंग करणाऱ्या व्यक्तीविरूध्द कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे अपर जिल्हादंडाधिकारी  विवेक घोडके  यांनी कळविले आहे.

00000

 

No comments:

Post a Comment

अमरावती येथे मंगळवारी होणार मतमोजणी मतमोजणी केंद्रात १७५ अधिकारी, कर्मचारी नियुक्त; पोलीस बंदोबस्तही चोख

  #अमरावती_विभाग_शिक्षक_मतदारसंघ_निवडणूक_2026 अमरावती येथे मंगळवारी होणार मतमोजणी मतमोजणी केंद्रात १७५ अधिकारी, कर्मचारी नियुक्त; पोलीस बंदो...