Monday, July 17, 2023

स्थानिक मच्छिमार, प्रकल्पग्रस्त तसेच महिलांना अर्ज करण्याचे आवाहन

 स्थानिक मच्छिमार, प्रकल्पग्रस्त तसेच

महिलांना अर्ज करण्याचे आवाहन

अमरावती, दि. 17 : जिल्ह्यातील चांदुर रेल्वे व नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील 500 हेक्टर खालील पाटबंधारे, जलसंधारण विभागाचे ‘रायगड प्रकल्प’ (252 हेक्टर) व निम्न साखळी प्रकल्प (165.90 हेक्टर) हे दोन तलाव मत्स्यव्यसाय विभागाकडे हस्तांतर‍ित करण्यात आले आहे. यासाठी तलाव परिसरातील स्थानिक मच्छिमार, प्रकल्पग्रस्त व महिला यांना संस्था नोंदणी करण्यास प्राधान्य देण्यात येईल.

तरी रायगड प्रकल्प (252 हेक्टर) व निम्न साखळी प्रकल्प (165.90 हेक्टर) या दोन तलावावर संस्था नोंदणी करण्यास इच्छुक असलेल्या स्थानिक मच्छिमार, प्रकल्पग्रस्त व मच्छिमार महिला यांनी सहायक निबंधक (सहकारी संस्था), अमरावती या कार्यालयाशी संपर्क साधून बातमी प्रसिध्द झाल्याच्या दिनांकापासून 30 दिवसांच्या कालावधीत संस्था नोंदणीसाठी प्रस्ताव सादर करावा, असे आवाहन सहायक आयुक्त मत्स्यव्यसाय सुरेश रा. भारती यांनी केले आहे.

0000

No comments:

Post a Comment

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #राज्यसरकार

  ‘ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ ’ #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #राज्यसरकार