Saturday, November 7, 2026

📍नागपूर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शेतकऱ्यांसोबत #दिवाळी साजरी करण्यासाठी लोहारी सावंगा (ता. नरखेड, जि. नागपूर) येथे आगमण होणार असल्याने गावात उत्साहाचे वातावरण आहे.




 📍नागपूर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शेतकऱ्यांसोबत #दिवाळी साजरी करण्यासाठी लोहारी सावंगा (ता. नरखेड, जि. नागपूर) येथे आगमण होणार असल्याने गावात उत्साहाचे वातावरण आहे. शेतीसह विविध प्रश्न मांडण्याची गावकऱ्यांना संधी मिळणार असून ग्रामस्थांना भेटीची उत्सुकता लागली आहे. मुख्यमंत्री आपल्या गावात येऊन शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी करणार आहेत, ही आमच्यासाठी आनंदाची बाब आहे. गावातील शेतकऱ्यांचे प्रश्न त्यांच्यापर्यंत थेट पोहोचतील आणि गावाच्या विकासाच्या अपेक्षांवरही चर्चा करता येईल, अशी भावना ग्रामस्थांमध्ये आहे. शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी मुख्यमंत्री स्वतः गावात येत असल्याने या भेटीकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर गावात आवश्यक तयारी सुरु आहे. #लोहारीसावंगा #दुष्काळ #शेतकरी #FarmerWelfare #DiwaliWithFarmers #Diwali

No comments:

Post a Comment

📍नागपूर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लोहारी सावंगा येथे शेतकरी रामभाऊ बालपांडे यांच्या निवासस्थानी मुक्काम करणार आहेत. त्यांचे हे सुंदर कौलारु घर...

नागपूर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लोहारी सावंगा येथे शेतकरी रामभाऊ बालपांडे यांच्या निवासस्थानी मुक्काम करणार आहेत. त्यांचे हे सुंदर कौलारु...