Wednesday, May 22, 2024

अचलपूर येथील मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतीगृहात प्रवेश देणे सुरू

 

अचलपूर येथील मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतीगृहात प्रवेश देणे सुरू

 

        अमरावती, दि. 22 (जिमाका): सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अचलपूर तालुक्यातील मागासवर्गीय मुलींच्या वसतीगृहात आठवी ते पदवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी आरक्षणानुसार प्रवेश देणे सुरू आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी प्रवेशाकरीता अर्ज सादर करावा, असे आवाहन मागासवर्गीय मुलींचे वसतीगृहाचे गृहपाल यांनी केले आहे.

 

            वसतीगृहात प्रवेशाबाबत प्रवर्ग निहाय जागा आरक्षित करण्यात आले असून ते खालील प्रमाणे आहेत.अनुसूचित जातीकरीता 80 टक्के, अनुसूचित जमाती 3 टक्के, वि.मा.प्र. 2 टक्के, इतर मागासवर्गीय 5 टक्के, वि.जा.भ.ज. 5 टक्के, दिव्यांगासाठी 3 टक्के व अनाथासाठी 2 टक्के आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. 

 

           वसतीगृहामध्ये ग्रंथालय, स्वतंत्र वाचन कक्ष, मोफत भोजन व निवास, विविध खेळ साहित्य, व्यायामाकरीता पोषक वातावरण, अध्ययन व अध्यापनाकरीता शैक्षणिक सुविधा, स्पर्धापरीक्षांचे योग्य मार्गदर्शन व शिबीर आयोजन करण्यात येतात. वर्ग आठवी, अकरावी व प्रथम वर्षासाठी रिक्त जागेनुसार दहावी ते बारावीच्या निकालानंतर प्रवेश अर्ज सादर करावा. अधिक माहितीसाठी भ्रमणध्वनी क्र. 7720823124, 9604308256, 8605631680 क्रमांकावर संपर्क साधावा.

 

      प्रवेशाकरीता आवश्यक कागदपत्रे : मागील वर्षाची गुणपत्रिका प्रत, पालकांची उत्पन्नाचा दाखला, जातीचे प्रमाणपत्र , आधार, रहीवासी दाखला, बँक पासबुक झेरॉक्स(एसबीआय), शाळा सोडल्याचा दाखला प्रत, दारीद्र्य रेषेखालील प्रमाणपत्र, बोनाफाईट, नजिकच्या सरकारी रूग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांचे स्वास्थ प्रमाणपत्र, पासपोर्ट साईज फोटो, गॅप सर्टीफीकेट असल्यास पालकांचे हमीपत्र करारनामा.

0000

अचलपूर येथील अनुसूचित जाती व नवबौध्द मुलींची शासकीय निवासी शाळेत प्रवेश सुरू

 

अचलपूर येथील अनुसूचित जाती व नवबौध्द मुलींची शासकीय निवासी शाळेत प्रवेश सुरू

 

        अमरावती, दि. 22 (जिमाका): सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागातंर्गत अचलपूर तालुक्यातील अनुसूचित जाती व नवबौध्द मुलींची शासकीय निवासी शाळा, बुरघाट येथे सहावी ते दहावीच्या प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. प्रवेशाकरीता इच्छुक पालकांनी आपल्या पाल्याचा प्रवेश करावा, असे आवाहन अनुसूचित जाती व नवबौध्द मुलींची शासकीय निवासी शाळेचे मुख्याध्यापक यांनी केले आहे.

 

            निवासी शाळेत मुलांना निवास, सुसज्य अद्यावत क्लास रूम, ग्रंथालय सुविधा, ई-लायब्ररी, भोजन, पाठ्यपुस्तके, आठवी शिष्यवृत्ती परिक्षा तयारी, वैयक्तिक विकासावर भर, विज्ञान केंद्र व शारिरीक शिक्षण, प्रशस्त क्रीडांगण, खेळाचे मार्गदर्शन व गणवेश अशा प्रकारच्या सुविधा मोफत उपलब्ध आहे. तसेच  विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी निवासी शाळेमध्ये वेळोवेळी विविध उपक्रमाचे आयोजन केले जातात.  

 

             प्रवेशाकरीता आवश्यक कागदपत्रे : मागील वर्षाची गुणपत्रिका प्रत, उत्पन्नाचा दाखला, जातीचे प्रमाणपत्र, आधार कार्ड, रहीवासी दाखला, बँक पासबुक झेरॉक्स(एसबीआय), शाळा सोडल्याचा दाखला, दारिद्रय रेषेखालील प्रमाणपत्र, बोनाफाईट, नजिकच्या सरकारी रूग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्याचे स्वास्थ  प्रमाणपत्र, पासपोर्टसाईज फोटो, गॅप सर्टीफीकेट असल्यास पालकांचे हमीपत्र, करारनामा.

 

              निवासी शाळेत प्रवेशाबाबत प्रवर्ग निहाय जागा आरक्षित करण्यात आले असून ते खालील प्रमाणे आहेत. अनुसूचित जाती मुलांकरिता 80 टक्के जागा, अनुसूचित जमाती मुलांकरिता 10 टक्के, विमाप्रकरीता 2 टक्के, विजाभज मुलांकरिता 5 टक्के, दिव्यांग मुलांकरिता 3 टक्के जागांचे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. आरक्षणानुसार सहावा वर्गासाठी 40 जागा, सातवीसाठी 1, आठवीसाठी 2 तर वर्ग दहावीसाठी 1 जागा रिक्त आहे. अधिक माहितीसाठी भ्रमणध्वनी क्र. 7720823124, 7020635557, 8788765371 या क्रमांकावर संपर्क साधावा.

00000

मतमोजणीची कामे अधिक जबाबदारीने व अचुकपणे पार पाडावी -जिल्हाधिकारी सौरभ कटियार मतमोजणी पूर्व नियोजनाबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा

 






मतमोजणीची कामे अधिक जबाबदारीने व अचुकपणे पार पाडावी                                                      -जिल्हाधिकारी सौरभ कटियार

 

मतमोजणी पूर्व नियोजनाबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा

 

        अमरावती,दि. 22 : लोकसभा सार्वत्रिक  निवडणुकीच्या अनुषंगाने मतमोजणी हा अत्यंत महत्वाचा टप्पा असतो. त्यामुळे मतमोजणीच्या कर्तव्यावर असलेल्या सर्व संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सोपविलेली कामे अधिक जबाबदारीने व अचुकपणे पार पाडावी, असे निर्देश निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी संबंधित नोडल अधिकाऱ्यांना दिले.

 

          अमरावती लोकसभा निवडणुकीची मतमोजणी येत्या 4 जूनला विद्यापीठ रोडवरील लोकशाही भवन येथे होणार आहे. त्यानुषंगाने मतमोजणी पूर्व नियोजनाबाबत आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी आज महसूल भवन येथे घेतला. त्यावेळी ते बोलत होते. अप्पर जिल्हाधिकारी सुरज वाघमारे, पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी,  उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर यांच्यासह सहाही विधानसभा मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक अधिकारी व कार्यन्वयन यंत्रणांचे प्रमुख आदी यावेळी उपस्थित होते.

 

       4 जूनला सर्वसाधारण मोजणी व पोस्टल बेलॅटची मतमोजणी होणार आहे. पोस्टल मतपत्रिकेची मतमोजणी सर्वात अगोदर होणार असून त्यासाठी सहा टेबल असणार. एका हॉलमध्ये 18 टेबल याप्रमाणे सहा हॉलमध्ये 108 टेबलवर मतमोजणी होणार आहे. मतमोजणीसाठी सहाय्यक निवडणूक अधिकारी कर्मचारी नियुक्त केले आहेत. मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी-कर्मचाऱ्यांचे सरमिसळीकरण (रॅन्डमायझेशन) प्रक्रिया आज होईल. तर येत्या दोन-तीन दिवसांत अधिकारी व कर्मचाऱ्यांना कंट्रोल युनिट, ईव्हीएम हातळण्याबाबत तसेच पोस्टल मतपत्रिका कशी उघडावी, मत कसे गणण्यात यावे याबाबत प्रशिक्षण दिले जाणार आहे.

 

          मतमोजणीसाठी करावयाची टेबलनिहाय रचना, संगणक व्यवस्था, माध्यम कक्ष, मतमोजणी केंद्रावरील प्रवेश व सुरक्षा व्यवस्था, सुरक्षा व्यवस्थेसाठी नियुक्त अधिकारी कर्मचारी, आपत्ती संबंधी नियंत्रण कक्ष, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी करावयाची पूर्वतयारी, भोजन व्यवस्था, मतमोजणी प्रक्रियेतील गोपनियता, वीज पुरवठा, सीसीटीव्ही, पिण्याच्या पाण्याची सुविधा, फिरते शौचालय, वाहनांसाठी पार्कींग व्यवस्था, इंटरनेट सुविधा, मतमोजणी केंद्रात प्रवेशासाठीचे ओळखपत्र या व अन्य महत्वाच्या बाबींसंदर्भात जिल्हाधिकारी श्री. कटियार सविस्तर आढावा घेतला.

 

0000

जागतिक तंबाखू नकार दिनानिमित्त जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत विविध उपक्रम

 

जागतिक तंबाखू नकार दिनानिमित्त जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत विविध उपक्रम

                  अमरावती, दि. 22 (जिमाका): तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ खाण्याचे प्रमाण तरूणांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. 31 मे रोजी जागतिक तंबाखू नकार दिनानिमित्त जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत विविध जनजागृतीपर कार्यक्रम राबविण्यात येत आहे.

 

            दरवर्षी 31 मे जागतिक तंबाखू नकार दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. लोकांमध्ये तंबाखूच्या दुष्परिणामाबाबत जनजागृती करून तंबाखू सारख्या वाईट व्यसनापासून दुर करणे हे या कार्यक्रमाचा उद्देश आहे. विविध उपक्रमातंर्गत शाळेतील मुलांना मार्गदर्शन कार्यशाळा, सोशल मीडिया, कोटपा 2003 कायद्याविषयी माहिती अशा विविध माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे. या वर्षीचे जागतिक तंबाखू नकार दिवसाचे घोषवाक्य ‘तंबाखू उद्योगाच्या हस्तक्षेपापासून मुलांचे सरंक्षण’ हे आहे.

           

           तंबाखूचे उत्पादन आणि सेवन यामध्ये भारताचा दुसरा क्रमांक असून तोंडाच्या कॅन्सरसाठी पहिला क्रंमाक लागतो. 63 टक्के मृत्यू असंसर्गजन्य आजार जसे की उच्चरक्तदाब मधुमेह, कर्करोग, (तोंडाचा, स्तनचा, गर्भाशय मुखाचा) पक्षाघात, फुफ्फुसाचे आजारामुळे होतात. यासाठी काही घटक कारणीभूत आहेत. असंतुलित आहार, व्यायामाचा अभाव, मद्याचे अतिप्रमाणात सेवन,  तंबाखूजन्य पदार्थाचे व्यसन आणि ताणतनाव या घटकांना आटोक्यात ठेवल्यास मृत्यूच्या प्रमाण टाळू शकतो.

 

कोटपा 2023 कायद्यातील विविध कमलानुसार सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान, तंबाखूजन्य पदार्थांचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष जाहिराती करण्यास, 18 वर्षातील मुलांना तंबाखू विकणे किंवा त्यांच्याकडून विक्री करणे तसेच शैक्षणिक संस्थेचा 100 मीटर परिसरात तंबाखू विकण्यास बंदी आहे. कलम 7 अंतर्गत तंबाखू जन्य पदार्थांच्या वेष्टनावर किंवा पाकिटावर चित्रमय धोक्याची सूचना देणे बंधनकारक आहे. तसेच महाराष्ट्र शासनाच्या दि. 10 जुलै 2023 च्या शासननिर्णय नुसार सर्व शासकीय, निमशासकीय, खाजगी कार्यालये, सुध्दा तंबाखू मुक्त ठेवण्याचे निर्देश आहे. शासकीय परिसरात तंबाखू तथा तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणे, बाळगणे कायद्याने गुन्हा आहे. अशा वाईट व्यसनापासून तरूणांना वाचविण्यासाठी सर्व शासकीय विभाग, स्वयंसेवी संस्था व नागरीकांनी पुढाकार घेऊन तंबाखूच्या व्यसनापासून दूर राहून आपल्या परिवाराला निरोगी ठेवा, असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.

00000

Tuesday, May 21, 2024

जिल्हाधिकारी कार्यालयात हिंसाचारविरोधी दिनाची शपथ

 


जिल्हाधिकारी कार्यालयात हिंसाचारविरोधी दिनाची शपथ

 

            अमरावती, दि. 21 (जिमाका): दहशतवाद व हिंसाचारविरोधी दिनानिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात शपथ घेण्यात आली. निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर यांनी यावेळी अधिकारी-कर्मचाऱ्यांना दहशतवाद व हिंसाचारविरोधी दिनाची शपथ दिली. यावेळी तहसिलदार भाग्यश्री देशमुख, निलेश खटके तसेच अधिकारी,कर्मचारी आदी उपस्थित होते.

                                                        0000

नांदगाव खंडेश्वर येथील मुलांची शासकीय निवासी शाळेत प्रवेश प्रक्रीया सुरू

 

नांदगाव खंडेश्वर येथील मुलांची शासकीय निवासी शाळेत प्रवेश प्रक्रीया सुरू

 

           अमरावती, दि. 21 (जिमाका): नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील अनुसूचित जाती व नवबौध्द मुलांच्या शासकीय निवासी शाळेत 2024-25 या शैक्षणिक वर्षाकरीता सेमी इंग्लिश माध्यमाच्या सहावी ते दहावीच्या प्रवेश प्रक्रिया सुरु झाले आहे. प्रवेशाकरीता इच्छुक पालकांनी आपल्या पाल्याचा प्रवेश करावा, असे आवाहन शाळेचे मुख्याध्यापक एल. झेड. सुरजुसे यांनी केले आहे.

           

            शासकीय निवासी शाळेत प्रवेशाकरीता अर्ज दि. 28 एप्रिल ते 26 जून 2024 या कालावधीत शासकीय निवासी शाळेत मोफत उपलब्ध असून शाळेत मोफत प्रवेश दिला जातो. निवासी शाळेत मुलांना निवास, सुसज्य अद्यावत क्लास रूम, ग्रंथालय सुविधा, ई-लायब्ररी, भोजन, पाठ्यपुस्तके व गणवेश अशा प्रकारच्या सुविधा मोफत उपलब्ध असून उच्च विद्याविभुषित शिक्षकवर्ग आहे. तसेच  विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी निवासी शाळेमध्ये वेळोवेळी विविध उपक्रमाचे आयोजन केले जातात.    

       

         निवासी शाळेत प्रवेशाबाबत प्रवर्ग निहाय जागा आरक्षित करण्यात आले असून ते खालील प्रमाणे आहेत. अनुसूचित जाती मुलांकरिता 80 टक्के जागा, अनुसूचित जमाती मुलांकरिता 10 टक्के, विजाभजच्या मुलांकरिता 5 टक्के, मागास प्रवर्ग मुलांकरिता 2 टक्के, दिव्यांगण व अनाथ मुलांकरिता 3 टक्के याप्रमाणे जागांचे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. प्रवेश संदर्भातील माहितीसाठी मुख्याध्यापक एल. झेङ सुरजुसे यांचा भ्रमणध्वनी क्र. 8888958239 वर संपर्क साधावा.

                                                      0000

जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची बैठक संपन्न; प्रलंबित प्रकरणाचा जलद निपटारा करा- अपर जिल्हाधिकारी सुरज वाघमारे

 


जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची बैठक संपन्न;

प्रलंबित प्रकरणाचा जलद निपटारा करा- अपर जिल्हाधिकारी सुरज वाघमारे

 

           अमरावती, दि. 21 (जिमाका) : अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989 अंतर्गत जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची सभा अपर जिल्हाधिकारी सुरज वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आज संपन्न झाली. यावेळी शहरी व ग्रामीण विभागात अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यातंर्गत घडलेले गुन्हे तसेच प्रलंबित गुन्ह्यांबाबत चर्चा करण्यात आली.

 

           अपर जिल्हाधिकारी श्री. वाघमारे यांनी प्रलंबित प्रकरणांचा लवकरात लवकर तपास पूर्ण करून दोषारोप न्यायालयात दाखल करण्याबाबत संबंधितांना सूचना दिल्या. तसेच निधी अभावी प्रलंबित प्रकरणांना अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा करण्याबाबत निर्देश दिले. यावेळी समाज कल्याण सहायक आयुक्त माया केदार, अमरावती शहर गुन्हे शाखा पोलीस निरिक्षक राहुल आठवले, ग्रामीण गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक  सतिश पाटील, सहायक पोलिस अधिक्षक के.पी. सुलभेवार, शासकीय अभियोक्ता रश्मी भागवत आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

 

          दक्षता समितीच्या बैठकीमध्ये माहे एप्रिल 2024 पर्यंतच्या प्रलंबित असलेल्या प्रकरणांचा आढावा घेण्यात आला. तसेच माहे एप्रिलमध्ये एकुण अनुसूचित जाती व जमातीचे शहर विभागात  6 तर ग्रामिण विभागात 6  प्रकरणे दाखल झाली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. न्यायालयात प्रलंबित प्रकरणे, अर्थसहाय्यासाठी प्रलंबित प्रकरणाचा आढावा  यावेळी घेण्यात आला.

                                                      000000

#पुण्यश्लोक_अहिल्यादेवी_होळकर_शेतकरी_कर्जमुक्ती_योजना २०२६

  #पुण्यश्लोक_अहिल्यादेवी_होळकर_शेतकरी_कर्जमुक्ती_योजना २०२६ #शेतकरीकर्जमुक्ती #अहिल्यादेवीहोळकर #कर्जमुक्तीयोजना2026 #FarmerWelfare #...