Friday, July 5, 2024

मागास प्रवर्गातील मुलामुलींना परदेशातील शिक्षणासाठी शिष्यवृत्ती; 15 जुलैपर्यंत मुदतवाढ

 

मागास प्रवर्गातील मुलामुलींना परदेशातील शिक्षणासाठी शिष्यवृत्ती; 15 जुलैपर्यंत मुदतवाढ

 

          अमरावती, दि. 05 (जिमाका): विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील मुलामुलींना परदेशातील शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली जाते.  सन 2024-25 करीता 75 विद्यार्थ्यांसाठी  दि. 30 जून 2024 पर्यंत अर्ज मागविण्यात आले होते. या योजनेस मिळालेला प्रतिसाद विचारात घेऊन 15 दिवसांची म्हणजेच दि. 15 जुलै 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. शिष्यवृत्ती योजनेचा लाभ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याणचे प्रादेशिक उपसंचालक विजय साळवे यांनी केले आहे.

                                                                    000000

Thursday, July 4, 2024

निती आयोगाच्या आकांक्षित तालुका कार्यक्रमातंर्गत 'संपुर्णता अभियानाचे' चिखलदरा येथून सुरुवात; विकासाच्या विविध योजना राबविणार

 










निती आयोगाच्या आकांक्षित तालुका कार्यक्रमातंर्गत 'संपुर्णता अभियानाचे' चिखलदरा येथून सुरुवात; विकासाच्या विविध योजना राबविणार

 

             अमरावती, दि. 04 (जिमाका): केंद्र शासनाच्या निती आयोगाच्या आकांक्षित तालुका ‘संपूर्णता अभियानाला’ आज चिखलदरा येथे सुरुवात झाली आहे. या अभियानाची सुरुवात रॅली काढून करण्यात आली. तसेच निती आयोगाने दिलेले उद्दिष्ट पुर्ण करण्यासाठी शपथ घेण्यात आली. चिखलदरा तालुका हा विकासापासून वंचित असल्यामुळे निती आयोगाने विशेष लक्ष देत अकांक्षित तालुका कार्यक्रम सुरु केला आहे. मागास प्रवर्गातील सर्व लोकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आजच्या अभियानाची सुरुवात करण्यात आली .

 

              नीती आयोगाचे एकुण 6 निर्देशांक पूर्ण करावयाचे आहे. त्यामध्ये आरोग्य, पोषण, कृषी, सामाजिक विकास या निर्देशांकावर भर देण्यात येत आहे. संपूर्णता अभियानामध्ये गर्भवती महिलांची प्रसुती पुर्व काळजी आणि त्यांना पोषक आहार, मधुमेह आणि उच्च रक्तदाब असणाऱ्या व्यक्तींची तपासणी आणि उपचार, माती परीक्षण, आणि बचत गट यांना मिळणारा फिरता निधी, शाळेतील विद्यार्थ्यांचा संक्रमण दर, दहावी व बारावी मधील पास विद्यार्थ्यांची टक्केवारी हे दर्शके आहेत.

 

नीती आयोगाचे रँकिंग नुसार चिखलदरा सद्या 500 पैकी 55 क्रमांकावर आघाडी घेत विकासात्मक रूपरेषा नुसार कार्य करत आहे. चिखलदरा आदिवासी बहुल असल्यामुळे इथे विकासाच्या विविध योजना निती आयोगामार्फत राबविण्यात येत आहे.

 

            चिखलदरा तालुका गट विकास अधिकारी जिवनलाल भीलावेकर यांनी या आकांक्षित तालुका संपूर्णता अभियानाचे दीप प्रज्वलन करून उद्घाटन केले. यावेळी गटविकास अधिकारी भीलावेकर यांनी अभियानांतर्गत असणाऱ्या  शिक्षण, आरोग्य, कृषी, उमेद, पशुसंवर्धन,पाणी स्वच्छ्ता, भौतिक सुविधा. पायाभूत सुविधा इ. विभागांच्या निर्देशांकांच्या प्रगतीचा आढावा घेत सर्व निर्देशांक पुर्ण करु असे ग्वाही सुद्धा दिली. गट विकास अधिकारी यांनी उपस्थितांसोबत स्वतः ही संपूर्णता अभियानातील दर्शकांची संपूर्णता करण्यासाठी योगदान देण्याचे आणि आकांक्षित तालुक्याला आरोग्यदायी, सक्षम आणि समृद्ध बनवण्याची प्रतिज्ञा घेतली.

 

            संपूर्णता अभियान हे 1 जूलै ते 30 सप्टेंबर 2024 दरम्यान चालणार आहे. त्यामधील एकुण 40 निर्देशांकपैकी 6 निर्देशांक येत्या 3 महिन्यामध्ये पुर्ण करण्याचे निती आयोगाला अपेक्षित आहे. या अभियानांतर्गत येणारे निर्देशांक आणि त्यांचा कृती आराखडा पुर्ण करण्यासाठीं विविध विभागाचे उपस्थित अधिकारी वर्गाने सुद्धा मार्गदर्शन केले. गटविकास अधिकारी यांनी आशा, अंगणवाडी सेविका, कर्मचारी, स्वयंसहायता बचत गट, एएनएम यांच्या कार्यातील प्रगतीचे कौतुक केले व सर्वांनी एकत्र येऊन आरोग्य आणि पोषण या क्षेत्रात उत्तम कामगिरी करावी,  असे आवाहन केले. तसेच तालुका आरोग्य अधिकारी, एकात्मिक बाल विकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, उमेद विभागाचे अधिकारी व संबंधित सर्व विभागांचे अधिकारी वर्ग उपस्थित होते. तसेच अकांक्षीत तालुका कार्यक्रम फेलो अतुल खडसे यांनी संचालन व आभार मानले.

000000

‘आचार्य चाणक्य कौशल्य केंद्र’ सुरू करण्यासाठी महाविद्यालयाना आवाहन

 

‘आचार्य चाणक्य कौशल्य केंद्र सुरू करण्यासाठी महाविद्यालयाना आवाहन

 

          अमरावती, दि. 04 (जिमाका): विद्यार्थ्यांना कौशल्य विकासाची संधी स्वत:च्या महाविद्यालयात उपलब्ध व्हावी, या दृष्टिकोनातुन शासनाने आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र ही नाविन्यपूर्ण योजना सुरू केली आहे. कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत या योजना विविध महाविद्यालयामध्ये कार्यान्वित केल्या जाणार आहे. यासाठी लिंक तयार करण्यात आली असून इच्छुक महाविद्यालयांनी गूगल फॉर्म भरून आपल्या विद्यार्थ्यांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून द्यावी, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रोच सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर यांनी केले आहे.

           

            योजनेंतर्गत जिल्ह्यातील इच्छुक महाविद्यालयात कौशल्य प्रशिक्षण केंद्र स्थापन करून 15 ते 45 वयोगटातील युवक, युवतींना भविष्यातील कौशल्य अभ्यासक्रमाच्या प्रशिक्षणाला प्राधान्य देऊन त्यांना आपल्या पायावर उभे राहण्यासाठी रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात. यासाठी केंद्र शासनामार्फत निश्चित केलेल्या कॉमन कॉस्ट नॉर्मनुसार कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्रांना विविध टप्प्यामध्ये प्रति प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण शुल्क अदा केले जाते. इच्छुक महाविद्यालयांमध्ये आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्याचा राज्य शासनाचा मनोदय आहे. यासाठी

 https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSeYeQH8Vr0z4Ye0R5MtICJwqXzUtF7HGIu5aIm33IXxeM46ng/viewform ही लिंक तयार करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत महाविद्यालयामध्ये या लिंक मधील माहिती संपूर्ण भरून आपली इच्छुकता दर्शविने गरजेचे आहे. तेव्हा जिल्ह्यातील जास्तीत जास्त महाविद्यालयांनी हा गूगल फॉर्म भरून आपल्या विद्यार्थ्यांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून द्यावी. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, शासकीय तांत्रिक विद्यालय परिसर, उस्मानिया मस्जिद जवळ,बस स्टॅन्ड रोड, अमरावती येथे प्रत्यक्ष भेट द्यावी. किंवा वैभव तेटु(7020958231), पंकज कचरे(8605654025) यांचेशी संपर्क साधावा.

0000

वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष निलेश हेलोंडे पाटील यांच्या हस्ते रोगनिदान व उपचार शिबिराचे उद्घाटन; रुग्णांनी घेतला शिबिराचा लाभ

 










वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष निलेश हेलोंडे पाटील यांच्या हस्ते रोगनिदान व उपचार शिबिराचे उद्घाटन; रुग्णांनी घेतला शिबिराचा लाभ

 

          अमरावती, दि. 04 (जिमाका): नादंगाव खंडेश्वर तालुक्यातील पापळ प्राथमिक आरोग्य केंद्र येथे आज मोफत रोगनिदान व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष निलेश हेलोंडे पाटील(राज्यमंत्री दर्जा) यांनी फित कापून उद्घाटन केले. शिबिराच्या माध्यमातून ग्रामिण भागातील गरीब, गरजू लोकांना चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध होत असून या शिबिराचा ग्रामस्थांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. हेलोंडे पाटील यांनी केले.

 

             डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख माजी कृषी मंत्री यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन व आरोग्य विभाग जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, तहसिलदार पुरषोत्तम भुसारी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. स्वप्निल मालखेडे, समाज कार्य महाविद्यालयाचे प्रा. दीपक काळे, पापळ प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक लांडगे तसेच पापळ ग्रामपंचायतचे सरपंच अनिता वानखडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

 

            केंद्र व राज्य शासन नागरिकांच्या आरोग्यासाठी विविध प्रकारच्या योजना राबवितात. शिबिराच्या माध्यमातून या योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यत पोहोचाव्या. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आवश्यक आरोग्य सोयीसुविधा व मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यासाठी प्रशासन व शासनाकडे पाठपुरावा करुन प्राथमिक केंद्र बळकट करण्यासाठी प्रयत्न करु, असे प्रतिपादन वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष निलेश हेलोंडे पाटील यांनी केले. तत्पूर्वी प्राथमिक आरोग्य केंद्रातील विविध विभागाला भेट देऊन तेथील सोयीसुविधा, औषधांचा साठा, रुग्णांची स्थिती, मनुष्यबळ आदी बाबींचा आढावा घेतला. यावेळी शिबिंराचा लाभ घेतलेल्या रुग्णांशी संवाद साधून मिळत असलेल्या सोयीसुविधेबाबत आस्थेने विचारपूस केली. रुग्णांना स्थानिक पातळीवर सर्व आवश्यक आरोग्य सुविधा प्राप्त होण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र अंत्यत महत्त्वपूर्ण असल्याचे श्री. हेलोंडे यावेळी म्हणाले.

 

             शिबिरात हृदयरोग, मधुमेह, रक्तदाब, त्वचारोग, क्षयरोग, कुष्ठरोग, नेत्ररोग, स्त्रीरोग, रक्त तपासणी, सिकलसेल, क्षय रुग्णांच्या थुंकीचे तपासणी, कर्करोग, लहान मुलांचे आजार इत्यादीवर निदान व उपचार करण्यात आले. या शिबिराचे मोठ्या संख्येने रूग्णांनी रोगनिदान व उपचार घेतले. कार्यक्रमाचे प्रस्तावना प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक लाडंगे यांनी तर संचालन आरोग्य सहायक आर.ई. मेश्राम यानी केले.

00000

मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरु: 31 जुलैपर्यंत अर्ज आमंत्रित

 

मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरु: 31 जुलैपर्यंत अर्ज आमंत्रित

 

          अमरावती, दि. 04 (जिमाका) : जिल्ह्यातील सर्व अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विजाभज, इतर मागासवर्ग आणि आर्थिक मागास प्रवर्गातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मागासवर्गीय मुला-मुलींच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी दि. 31 जुलै 2024 पर्यंत अर्ज सादर करावा, असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त यांनी केले आहे.

 

             सामाजिक न्याय विभागाअंतर्गत कार्यरत असलेल्या मागासवर्गीय मुला/मुलींचे शासकिय वसतिगृहात प्रवेशित विद्यार्थ्यांना सर्व सोयी सुविधा मोफत पुरविण्यात येतात. सन 2024-25 साठी ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यावयाचा आहे, अशा विद्यार्थ्यांनी अमरावती स्थानिक वसतिगृहामध्ये कनिष्ठ व वरीष्ठ महाविद्यालय प्रवेशासाठी प्रवेश अर्ज विभागीय स्तरावरील मागासवर्गीय 1 हजार मुलांसाठी शासकिय वसतिगृह युनिट क्र.1, 2, 3 निंभोरा, गुणवंत मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, निंभोरा व संत गाडगे महाराज मुलांचे शासकिय वसतिगृह निंभोरा तसेच मुलींसाठी मागासवर्गीय मुलींचे शासकिय वसतिगृह कॅम्प अमरावती, गुणवंत मुलींचे शासकिय वसतिगृह जेल रोड, अमरावती तसेच विभागीय स्तरावरील 250 मुलींचे युनिट क्र. 4 अमरावती व 125 जयंती मागासवर्गीय मुलींचे (नविन) विलास नगर, अमरावती तसेच तालुकास्तरावरील मुला-मुलींचे शासकीय वसतिगृह कनिष्ठ महाविद्यालयीन पदवी, पदवीका, पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश अर्ज वाटपाबाबतची प्रक्रीया सुरू झाली आहे. विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज संबंधित वसतिगृहाकडे सादर करावे. कनिष्ठ महाविद्यालय व अव्यावसायिक अभ्याक्रम यांनी दि. 31 जुलैपर्यंत अर्ज करावा. तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमाचे वेळापत्रक स्वतंत्रपणे प्रसिध्द केले जाईल. अधिक माहितीसाठी दुरध्वनी  क्रमांक 0721-2661261 वर संपर्क साधावा.

000000

शहरात कलम 37 (1) व (3) लागू

 

शहरात  कलम 37 (1)  व (3) लागू

 

             अमरावती, दि. 04 (जिमाका) : शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलीस आयुक्त  (अमरावती शहर) यांनी महाराष्ट्र पोलिस कायद्याचे कलम 37 (1) व (3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे.

 

              सदर प्रतिबंधात्मक आदेश शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, याकरिता पोलिस आयुक्तालयाच्या परिक्षेत्रात लागू करण्यात आला असून   दि. 5 जुलै  ते 19 जुलै 2024 च्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहील. या कलमाचा भंग करणाऱ्या व्यक्तीविरूध्द कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे पोलीस आयुक्त (अमरावती शहर)  नविनचंद्र रेड्डी  यांनी कळविले आहे.

000000

सहकारी व्यवस्थापन पदविकासाठी प्रवेश सूरू; अर्ज करण्याचे आवाहन

 

सहकारी व्यवस्थापन पदविकासाठी प्रवेश सूरू; अर्ज करण्याचे आवाहन

           अमरावती, दि. 04 (जिमाका):  सहकारी संस्थांमध्ये काम करण्यासाठी सहकारी व्यवस्थापन पदविका अनिवार्य केले आहे. या अभ्यासक्रमासाठी भाऊसाहेब भोकरे सहकार प्रशिक्षण केंद्र, अमरावती येथे दि. 1 जुलै ते 31 डिसेंबर 2024 या मुदतीसाठी प्रवेश देणे सुरू आहे. इच्छुकांनी प्रशिक्षण केंद्रात संपर्क साधून प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन भाऊसाहेब भोकरे सहकार प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य यांनी केले आहे.

 

         सहकारी संस्थांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांचे कामकाज सांभाळून हा अभ्यासक्रम दुरूस्थ शिक्षण पध्दतीने पुर्ण करता यावा. तसेच राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरूणांना सहकार क्षेत्रातील विविध सहकारी संस्थामध्ये या पदविका अभ्यासक्रमामुळे नोकरीची संधी उपलब्ध व्हावी, म्हणून महाराष्ट्र राज्य सहकारी संघाने 13 सहकार प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातुन हा अभ्यासक्रम पोस्टल पध्दतीने सुरू केला आहे. या अभ्यासक्रमासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी संघ मर्या. पुर्ण अंतर्गत भाऊसाहेब भोकरे सहकार प्रशिक्षण केंद्र अमरावती येथे दि. 1 जुलै 2024 ते 31 डिसेंबर 2024 या मुदतीसाठी प्रवेश देणे सुरू आहे. अधिक माहितीसाठी 9881047668 या क्रमांक संपर्क साधावा.

00000

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक मुंबई, दि. ९ : अमरावती वन विभागातील ...