Saturday, August 20, 2016

या वर्षाचा गणेशोत्सव शासनाच्यावतीने
लोकमान्य टिळकांच्या संकल्पनेतून साजरा करणार
मंडळांच्या स्पर्धांची माहिती देण्यासाठी
19 ऑगस्ट रोजी 5 वा. सभेचे आयोजन
          अमरावती, दि.17 (जिमाका) : या वर्षीचा गणेशोत्सव शासनाच्या वतीने लोकमान्य महोत्सव व सार्वजनिक गणेशोत्सव अभियान हा लोकमान्य टिळकांच्या संकल्पनेतून साजरा करण्याचे निश्चित केले आहे. राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री सुधिर मुनगंटीवार यांनी नुकतीच व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली यावेळी त्यांनी हे निर्देश दिले असल्याची माहिती जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी दिली.  
          गित्ते म्हणाले की, लोकमान्य महोत्सवाच्या निमित्ताने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत प्रत्येक तालुक्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सहभागी व्हावे असे अपेक्षित असुन स्पर्धेची सविस्तर माहिती देण्यासाठी व मंडळांना सहभागी करुन घेण्यासाठी शासनाच्या वतीने आवाहन करण्याकरीता लोकमान्य महोत्सव समितीचे सदस्य संजय फांजे हे अमरावती येथे येत असुन दि.19 ऑगस्ट, 16 रोजी सायं.5 वाजता संगितसुर्य केशवराव भोसले सभागृह, शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था, अमरावती (जुने व्हिएमव्ही कॉलेज) येथे आयोजन करण्यात आले आहे. नोंदणीकृत गणेश मंडळाचे अध्यक्ष किंवा सचिवांनी सभेल उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #राज्यसरकार

  ‘ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ ’ #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #राज्यसरकार