Tuesday, August 2, 2016

16 वर्षाची कोमल श्रीकृष्ण सवई बेपत्ता
          अमरावती, दि. 2: पोलिस आयुक्तालय अमरावती, शहर पोलिस ठाणे फेजरपुरा हद्दीतील कु. कोमल श्रीकृष्ण सवई ही राहणार व्यंकैयापुरा, अमरावती दि.19 मार्च, 16 रोजी 17-30 वाजता घरी कोणालाही न सांगता निघुन गेली व परत आली नाही. पोलिस ठाणे फेजरपुरा येथे दि.20 मार्च, 16 रोजी अप क्र 211/2016 कलम 363 भा.द.वि. नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्यापर्यंत तिचा शोध लागला नाही, असे सहा.पोलिस आयुक्त, गुन्हे शाखा, अमरावती शहर यांनी कळविले आहे.
          बेपत्ता कोमल सवई ही 16 वर्षाची असुन तिची उंची 5 फुट 3 इंच आहे. तिचा रंग सवळा, बांधा सडपातळ, कपडे गुलाबी रंगाचे सलवार सुट, काळ्या रंगाची कॉलेज बॅग आहे. ज्या कोणाला ह्या मुलीबाबत काही माहिती सांगावयाचे असल्यास किंवा शोध लागला तर पोलिस स्टेशन  फेजरपुरा येथे 0721-2552600 या क्रमांकावर किंवा नियंत्रण कक्ष अमरावती शहर येथे 0721-2551000 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन गुन्हे शाखा, अमरावती शहराचे सहायक पोलीस आयुक्त यांनी केले आहे.

                                                          00000

No comments:

Post a Comment

भरती परीक्षा अधिक सुरक्षित,पारदर्शक,विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी गठीत उच्चस्तरीय टास्क फोर्स १७ सप्टेंबर रोजी #अमरावती येथे येणार.

  भरती परीक्षा अधिक सुरक्षित,पारदर्शक,विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी गठीत उच्चस्तरीय टास्क फोर्स १७ सप्टेंबर रोजी #अमरावती येथे येणा...