Monday, August 1, 2016

लोकशाही दिनात दोन तक्रारींची सुनावणी
     अमरावती, दि.01 : जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी मोहन पातुरकर यांच्या अध्यक्षतेखाली लोकशाही दिनाचे कामकाज करण्यात आले. यावेळी परिविक्षाधिन आयएएस राहुल कर्डिले, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय मुळे, पुरवठा अधिकारी वानखडे तसेच सबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
          या जिल्हा लोकशाही दिनात 2 तक्रारींची सुनावणी होती. दोन्ही तक्रारी संबंधित विभागांकडे आवश्यक कार्यवाही करीता पाठविण्यात आल्या. 8 प्रलंबित प्रकरणांपैकी 1 प्रकरणाचा अहवाल संबंधित कार्यालयाकडून प्राप्त झाला आहे तसेच 16 निवेदने प्राप्त झाली. नझुल जि.का.अमरावती 1, तहसिलदार चांदूर बाजार 3, जिल्हा परिषद अमरावतीशी संबंधित 2, महावितरण 1, कृषि विभाग 1, उप निबंधक सहकारी संस्था 1, भुमिअभिलेख 1 एकूण 10 तक्रारी प्राप्त झाल्या. प्राप्त निवेदनावर संबधित कार्यालय प्रमुखांनी तातडीने कारवाई करुन निवेदन कर्त्याचे समाधान करण्याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी यांनी निर्देश दिले.
00000

काचावार/गावंडे/कोल्हे/दि.01-08-16/15-35 वा.


 

No comments:

Post a Comment

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #राज्यसरकार

  ‘ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ ’ #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #राज्यसरकार