Saturday, August 20, 2016

राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचे प्रशिक्षण
23 ऑगस्ट पासुन

       अमरावती, दि.20 (जिमाका): वरिष्ठ कोषागार कार्यालयातर्फे जिल्हा स्तरावर आहरण व संवितरण अधिकाऱ्यांकरीता सहसंचालक कार्यालय, लेखा-कोष भवन, विद्यापीठ रोड, अमरावती येथे प्रशिक्षण आयोजित केले आहे.
          यामध्ये राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना व त्यांचे फायदे, सेवानिवृत्ती नंतरचे लाभ, आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी करायची विस्तृत कार्यपद्धती, प्राण कीटचा वापर, कर्मचाऱ्यांच्या माहिती दुरुस्ती करण्यासाठी सविस्तर माहिती देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणात आहरण व संवितरण अधिकारी, वेतन देयक लिपीक व एनपीएस बाबत माहितीगार कर्मचारी यांनी उपस्थित राहावे. आहरण अधिकाऱ्यांनी सीएसआरएफ फार्मची माहिती सोबत आणावी. हे प्रशिक्षण महत्वाचे असून यासाठी संबंधितांनी उपस्थित रहावे. 23 ते 26 ऑगस्ट रोजी सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यत प्रशिक्षण होईल, असे वरिष्ठ कोषागार अधिकारी व्यं. व. जोशी यांनी कळविले आहे. 

                                                                        00000

No comments:

Post a Comment

#अमरावती_विभाग_शिक्षक_मतदारसंघ_निवडणूक_2026 दिनांक 23 ऑक्टोबर, 2026 रोजी सकाळी 08.00 वा. ते दुपारी 16.00 वाजे पर्यंत झालेल्या अंतीम मतदानाची आकडेवारी

  # अमरावती _ विभाग _ शिक्षक _ मतदारसंघ _ निवडणूक _2026 दिनांक 23 ऑक्टोबर, 2026 रोजी सकाळी 08.00 वा. ते दुपारी 16.00 वाजे पर्यंत झालेल्या...