Saturday, August 20, 2016

अमरावती जिल्हा रुग्णालयातील सिटी स्कॅन चा
आज लोकार्पण सोहळा  

       अमरावती, दि.18 (जिमाका) : जिल्हा जिल्हा नियोजन समिती अमरावती यांच्या माध्यमातून प्राप्त झालेल्या 2 कोटी 42 लक्ष रुपये निधीच्या माध्यमातून नव्याने स्थापित करण्यात आलेल्या सिटी स्कॅन मशिनचा शुभारंभ पालकमंत्री प्रविण पोटे यांच्या हस्ते आज दुपारी 2 वाजता ज्ल्हिा रुग्णालय येथे होणार आहे. या समाराभाच्या अध्यक्षस्थानी आमदार सुनिल देशमुख राहणार असून खासदार, आमदार, जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य, जिल्हा परिषद व महानगरपालिका यांचे प्रतिनिधी, विविध सामाजिक संघटनेचे प्रतिनिधी यांना निमंत्रीत केले आहे. आरोग्य विभागाच्या सचिव श्रीमती सुजाता सौनिक मॅडम, आरोग्य संचालक डॉ.जाधव , अतिरिक्त संचालक पाटील मॅडम, तसेच पोलिस महासंचालक दत्तात्रय मंडलिक, विशेष पोलिस महानिरिक्षक विठ्ठल जाधव आदि मान्यवर या सोहळ्यास उपस्थित राहाणार आहेत.
          तरी सर्वांनी या समारंभास उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अरुण राऊत यांनी केले आहे.

                                                00000 

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 10.06.2026

  शुक्रवारी जागतिक बाल कामगार प्रथाविरोधी दिन अमरावती, दि. 10 (जिमाका) : बालमजुरी या अनिष्ठ प्रथेविरूद्ध विस्तृत प्रमाणात जनजागृती करणे आवश्...