Friday, September 30, 2022

आदिवासी शासकीय वसतीगृहाकरीता इमारत भाडे तत्वावर देण्यासाठी ५ ऑक्टोबर पर्यंत प्रस्ताव सादर करावे

 आदिवासी शासकीय वसतीगृहाकरीता इमारत भाडे

तत्वावर देण्यासाठी ५ ऑक्टोबर पर्यंत प्रस्ताव सादर करावे

अमरावती दि.30 (विमाका) : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प धारणी अंतर्गत येत असलेल्या अमरावती येथील आदिवासी मुले/मुलींचे शासकीय वसतीगृह, (विद्यार्थी क्षमता ५००, ३०० व २५० असलेले) विद्यार्थ्यांच्या निवासाकरीता सर्व सोई-सुविधा असलेले म्हणजेच निवासी खोल्या, स्नानगृह, शौचालय उद्यालय, संगणक कक्ष व पाणी पुरठ्याची सोय इत्यादी असलेल्या स्वमालकीच्या इमारती माडे तत्वावर उपलब्ध करुन देण्यास इच्छुक असलेल्या स्थानिक इमारत मालकांकडून भाडे प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. भाडे प्रस्ताव प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, धारणी ता.धारणी जि. अमरावती येथे दि. ५ ऑक्टोबर २०२२ पर्यंत सादर करण्यात यावेत, असे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी कळविले आहे.

००००००

No comments:

Post a Comment

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #राज्यसरकार

  ‘ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ ’ #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #राज्यसरकार