Monday, September 12, 2022

कुष्ठ व क्षय रुग्णशोध मोहीम आजपासून

कुष्ठ व क्षय रुग्णशोध मोहीम आजपासून

 

अमरावती, दि. 12 : कुष्ठरुग्ण शोध व सक्रिय क्षय रुग्ण शोध मोहीम उद्यापासून (13 सप्टेंबर) दि. 30 सप्टेंबरपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे.

 

त्याचा शुभारंभ उद्या मंगळवारी सकाळी 8 वाजता नेहरू मैदानात होईल. यावेळी बाईक, कार, सायकल व पायदळ रॅली काढण्यात येणार आहे. बाईक, कार, सायकल रॅली नेहरू मैदानापासून जयस्तंभ चौक, इर्विन चौक, गर्ल्स हायस्कूल चौक, मालटेकडी, बसस्थानक रस्त्यापासून पुन्हा नेहरू मैदानाकडे परतेल, तर पायदळ रॅली नेहरू मैदानापासून राजकमल, जयस्तंभ चौक मार्गे फिरून नेहरू मैदानात परतेल.

 

 कुष्ठरोग व क्षयरोगाबाबत आरोग्य कर्मचारी घरोघरी जाऊन तपासणी करणार आहेत त्याचप्रमाणे जनजागृतीही करण्यात येत असल्याचे सहाय्यक आरोग्य संचालकांनी सांगितले.

०००


No comments:

Post a Comment

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #राज्यसरकार

  ‘ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ ’ #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #राज्यसरकार