Tuesday, September 13, 2022

अंजनगाव सुर्जी तालुक्यातील 37 हजार पिकांची नोंद ई-पीक पाहणी ॲप्सवर होणार

 


अंजनगाव सुर्जी तालुक्यातील  37 हजार

 पिकांची नोंद ई-पीक पाहणी ॲप्सवर होणार

 

अमरावती, दि.13 : जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या पिकांची नोंद ई-पीक पाहणी ॲप्समध्ये नोंदविण्याबाबत गुरूवार, दि. 15 सप्टेंबर रोजी एकाच दिवशी विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे. माझी शेती माझा सातबारा, मीच नोंदविणार माझा पीकपेरा अंतर्गत अंजनगाव तालुक्यातील 36 हजार 728 शेतकरी खातेदारांच्या पिकांची नोंद या ॲप्समध्ये करण्याबाबत जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी सूचित केले आहे.

अंजनगाव सुर्जी तालुक्यातील शेतकरी, सरपंच, ग्रासेवक, तलाठी, कृषी सहायक, पोलीस पाटील, सेतू संचालक, स्वस्त धान्य दुकानदार, तरूण व सामाजिक मंडळ यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन ई-पीक पाहणी ॲप्समध्ये पिकांची नोंदणी करण्याबाबत शेतकऱ्यांना सहकार्य करण्याचे  करण्याचे आवाहन अंजनगाव सुर्जीचे तहसिलदार अभिजीत जगताप यांनी केले आहे.    

00000

No comments:

Post a Comment

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #राज्यसरकार

  ‘ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ ’ #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #राज्यसरकार