Friday, September 23, 2022

तृतीयपंथींसाठी आरोग्य शिबीर व ओळखपत्राचे वाटप

 



तृतीयपंथींसाठी आरोग्य
 शिबीर व ओळखपत्राचे वाटप

 

अमरावती, दि.23 (जिमाका) : आरोग्य व समाजकल्याण विभागातर्फे डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनात तृतीयपंथी व ट्रान्सजेंडर्संसाठी आरोग्य शिबीर व ओळखपत्र वाटपाचा कार्यक्रम नुकताच झाला. त्यात 25 व्यक्तींनी सहभाग घेतला.

            प्रादेशिक उपायुक्त सुनील वारे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. सहायक आयुक्त माया केदार, जिल्हा समाज कल्याण अधिकारी राजेंद्र जाधवर, जिल्हा आरोग्य कार्यक्रम अधिकारी अजय साखरे, तृतीयपंथी जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीच्या रेखा पाटील तसेच, समर्पण ट्रस्टचे प्रतिनिधी उपस्थित होते.

            तृतीयपंथी  ट्रान्सजेंडर यांच्या मुलभूत अधिकाराचे संरक्षण करुन त्यांना विकासाची समान संधी उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. त्यासाठी सेवा पंधरवड्यानिमित्त उपक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळावा  त्यांच्या तक्रारींचे निवारण व्हावे यासाठी पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. संबंधितांनी http://transgender.dosje.gov.in या पोर्टलवर नोंदणी करावी, असे आवाहन श्रीमती केदार यांनी केले.

00000


No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 10.06.2026

  शुक्रवारी जागतिक बाल कामगार प्रथाविरोधी दिन अमरावती, दि. 10 (जिमाका) : बालमजुरी या अनिष्ठ प्रथेविरूद्ध विस्तृत प्रमाणात जनजागृती करणे आवश्...