Wednesday, November 5, 2025

DIO NEWS AMRAVATI 5-11-202

 जिल्ह्यातील 10 नगरपरिषद, 2 नगरपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

अमरावती, दि. 5 (जिमाका) : जिल्ह्यातील 10 नगरपरिषद, 2 नगरपंचायत अध्यक्ष आणि सदस्य पदाच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम - 2025 जिल्हाधिकारी कार्यालयाने प्रसिद्ध केला आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या संदर्भानुसार हा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

जिल्ह्यातील अचलपूर, अंजनगाव-सुर्जी, वरुड, दर्यापूर, मोर्शी, शेंदूरजना घाट, चिखलदरा, चांदूर रेल्वे, चांदूर-बाजार आणि धामणगाव - रेल्वे या नगरपरिषद आणि धारणी आणि नांदगाव - खंडेश्वर या नगरपंचायतीची निवडणूक होणार आहे.

जिल्हाधिकारी यांनी जाहीर केलेल्या सूचनेनुसार नामनिर्देशनपत्र राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या वेबसाईटवर भरण्याकरिता कालावधी हा 10/11/2025 ते 17/11/2025 रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत राहणार आहे. नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्याचा कालावधी हा 10/11/2025 ते 17/11/2025 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत राहणार आहे. रविवार  आणि सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यात येणार नाहीत. नामनिर्देशनपत्रांची छाननी 18/11/2025 रोजी सकाळी 11 वाजेपासून होणार असून याच दिवशी वैधरीत्या नामनिर्देशित झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याचा अंतिम दिनांक अपील नसल्यास 19/11/2025 ते 21/11/2025 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत राहणार आहे.

अपील असल्यास वैधरित्या नामनिर्देशित केलेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध झाल्याचे तारखेपासून तीन दिवसाच्या आत जिल्हा न्यायाधीशाकडे अपील करता येईल. निवडणूक निर्णय अधिकारी अपिलाचा निर्णय लवकरात लवकर प्राप्त करून घेण्यासाठी प्रयत्न करतील. मात्र 21/11/2025 ते 25/11/2025 अपिलाचा निर्णय ज्या तारखेस करण्यात येईल त्या तारखेनंतर तिसऱ्या दिवशी किंवा तत्पूर्वी मात्र दिनांक 25/11/2025 पर्यंत यासाठी कालावधी आहे.

निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा आणि अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी 26/11/2025 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानंतर 2/12/2025 रोजी सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 पर्यंत मतदान होईल. दि. 3/12/2025 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणी करण्यात येणार आहे. कलम 19 मधील तरतुदीनुसार 10/12/2025 पूर्वी निकाल राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

00000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 12-11-2025

                                                         'अमृत दुर्गोत्सव 2025'ला गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचा बहुमान! शिवछत्रपतींना दिली ...