Tuesday, August 1, 2023

नागरिकांच्या तक्रारीचे निवारणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात हेल्प डेस्कची स्थापना

 नागरिकांच्या तक्रारीचे निवारणासाठी

 जिल्हाधिकारी कार्यालयात हेल्प डेस्कची स्थापना

 

        अमरावती, दि. 1 : महसूल विभागामार्फत दि. 7 ऑगष्टपर्यंत महसूल सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या कालावधीत प्रशासना संदर्भातील कामे जलद गतीने पूर्ण करणे तसेच गरजू नागरिकांना मार्गदर्शन कामासंदर्भात शंकांचे निरसन करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्ष येथे हेल्पडेस्क स्थापना करुन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नियंत्रण कक्ष दुरध्वनी क्रमांक 0721-266066 आहे. तसेच नागरिकांना व्हॉट्सॲप संदेशाव्दारे माहिती देण्यात येणार आहे. महसूल सप्ताहा दरम्यान नागरिकांनी आपल्या तक्रारीकरीता हेल्प डेस्ककडे नोंदणी करावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी   डॉ. विवेक घोडके यांनी केले.

00000

No comments:

Post a Comment

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #राज्यसरकार

  ‘ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ ’ #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #राज्यसरकार