Friday, August 11, 2023

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्याची मुदत १५ ऑगस्टपर्यंत

 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्याची मुदत १५ ऑगस्टपर्यंत

        अमरावती, दि. 11 (जिमाका):  महिला व बालविकास विभागामार्फत महिला व बाल विकास क्षेत्रात उत्कृष्ठ काम करणाऱ्या महिलांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार दिला जातो. सन 2020-21,2021-22,2022-23 व 2023-24 या कालावधीतील राज्य, विभागीय व जिल्हास्तरावरील पुरस्कारासाठी समाजसेविका व संस्थेकडून प्रस्ताव मागविण्यात येत आहे. पात्र इच्छुक समाजसेविका व संस्थांनी आपला प्रस्ताव दि. 15 ऑगस्ट 2023 पर्यंत सादर करावा, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांनी केले.

        इच्छुक व्यक्ती, स्वयंसेवक संस्था यांनी विहित नमुन्यातील अर्जासाठी तसेच अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी ‘दत्तात्रय सदन दसरा मैदान रोड, भुतेश्वर चौक, देशपांडेवाडी, अमरावती दूरध्वनी क्रमांक 0721-2990412 या कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच आवश्यक सर्व प्रमाणपत्रासह परिपूर्ण प्रस्ताव तीन प्रतीत दि. 15 ऑगस्ट 2023 पर्यंत कार्यालयाच्या पत्त्यावर सादर करावा. मुदतीनंतर येणाऱ्या प्रस्तावांचा विचार केल्या जाणार नाही. याबाबत संबंधितांनी नोंद घ्यावी, असे जिल्हा महिला व बाल विकास कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

00000

No comments:

Post a Comment

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #राज्यसरकार

  ‘ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ ’ #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #राज्यसरकार