Monday, August 28, 2023

प्रादेशिक परिवहन विभागाचा उपक्रम; वाहनचालकांसाठी दि. 30 व 31 ऑगस्टला आरोग्य तपासणी शिबिर

 प्रादेशिक परिवहन विभागाचा उपक्रम; वाहनचालकांसाठी

दि. 30 व 31 ऑगस्टला आरोग्य तपासणी शिबिर

 

अमरावती, दि. 28: वाढत्या अपघाताला आळा घालण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय अमरावतीच्या वतीने दि. 30 व 31  ऑगस्ट रोजी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात वाहन चालकांचे रक्तदाब बीपी,  मधुमेह सुगर,  नेत्र तपासणी व हृदय स्पंदन ईसीजी  इतर बाबींची तपासणी करण्यात येणार आहे. तरी  वाहन चालकांनी आपले आरोग्य तपासणी शिबीरामध्ये करून घ्यावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी राजाभाऊ गीते यांनी केले आहे.

 

डॉ. पंजाबराव देशमुख मेडिकल कॉलेज अमरावती व महामार्ग पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने जुना बायपास रोडवरील हॉटेल तंदुरी नाइट्स व लोणी परिसरातील हॉटेल्स व ढाबे या ठिकाणी  रात्री 7 ते 11  या वेळेत  येणाऱ्या वाहन चालकांचे आरोग्य तपासणी केली जाणार आहे. आरोग्य तपासणीनंतर वाहनचालकात गंभीर दोष आढळल्यास त्याला त्याबाबत शिफारस पत्र देऊन जिल्हा सामान्य रुग्णालय येथे पुढील उपचारासाठी पाठविण्यात येईल.

 

दिवसेंदिवस रस्ते अपघात ही गंभीर समस्या निर्माण झाल्याने दरवर्षी लाखो व्यक्ती रस्ते अपघातात आपला जीव गमावत आहे.  तर कित्येक लोकांना अपघातामुळे कायमचे अपंगत्व येते अशा व्यक्ती अथवा त्यांच्या कुटुंबांना अनेक आर्थिक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. रस्ता सुरक्षा ही परिवहन विभागाच्या महत्त्वाची जबाबदारी आहे. यासाठी  परिवहन विभागामार्फत रस्ते सुरक्षा संदर्भात वाहन चालकांच्या वाहन चालविण्याच्या कौशल्यात त्यांचे संपूर्ण आरोग्य तसेच वाहन चालकांच्या दृष्टीस अती महत्त्व आहे. चालकाला कुठल्याही प्रकारची व्याधी अथवा दृष्टीदोष असेल तर वाहन चालविताना त्याला अडचणी येत असतात. परिणामी अशा परिस्थितीत अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी वाढत्या अपघाताला आळा घालण्यासाठी नियमित आरोग्य तपासणी करणे आवश्यक आहे. वाहनचालकांनी आपले आरोग्य तपासणी करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

000000



No comments:

Post a Comment

#अमरावती_विभाग_शिक्षक_मतदारसंघ_निवडणूक_2026 दिनांक 23 ऑक्टोबर, 2026 रोजी सकाळी 08.00 वा. ते दुपारी 16.00 वाजे पर्यंत झालेल्या अंतीम मतदानाची आकडेवारी

  # अमरावती _ विभाग _ शिक्षक _ मतदारसंघ _ निवडणूक _2026 दिनांक 23 ऑक्टोबर, 2026 रोजी सकाळी 08.00 वा. ते दुपारी 16.00 वाजे पर्यंत झालेल्या...