Monday, August 7, 2023

नागरी सेवा परीक्षेच्या पूर्व प्रशिक्षणासाठी 14 ऑगस्टपर्यंत अर्ज करावा

 

नागरी सेवा परीक्षेच्या पूर्व प्रशिक्षणासाठी

14 ऑगस्टपर्यंत अर्ज करावा

 

        अमरावती, दि.  दि.7 (जिमाका) :  केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षा - 2024 च्या पूर्व प्रशिक्षणासाठी विनामुल्य प्रशिक्षण देण्यासाठी भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्रातील प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा  ऑनलाईन पध्दतीने राज्यस्तरावरून घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी जाहिरातीत नमूद केलेल्या अटींची पूर्तता करणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. परीक्षासंबंधी अर्ज करण्याचे आवाहन अमरावती येथील भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्राच्या संचालिका डॉ. संगीता पकडे यांनी केले आहे.

ऑनलाईन पध्दतीने प्रवेश अर्ज व भरण्याची अंतिम मुदत सोमवार, दि. 14 ऑगस्ट 2023 पर्यंत आहे. परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दि. 15 ऑगस्ट 2023 पर्यत आहे. प्रवेश परीक्षा (एन्ट्रन्स एक्झाम) रविवार, दि. 27 ऑगस्ट 2023  रोजी ऑफलाईन पध्दतीने घेण्यात येणार आहे.

परीक्षेचा कालावधी सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत राहील. याची नोंद संबंधित विद्यार्थ्यांनी घ्यावी, असे भारतीय प्रशासकीय पूर्व प्रशिक्षण केंद्रामार्फत कळविण्यात आले आहे. यासंबंधी सविस्तर माहिती, जाहिरात, परीक्षेचा अभ्यासक्रम, अर्ज तसेच परीक्षेसंबंधी इतर सूचना www.siac.org.in  या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, असे भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्रामार्फत कळविण्यात आले आहे.                                                         

00000

 

No comments:

Post a Comment

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #राज्यसरकार

  ‘ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ ’ #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #राज्यसरकार