Thursday, August 10, 2023

सहकार विभागातील रिक्त पदांसाठी ऑनलाईन परीक्षा 14 व 16 ऑगस्ट रोजी

 

सहकार विभागातील रिक्त पदांसाठी

ऑनलाईन परीक्षा 14 व 16 ऑगस्ट रोजी

अमरावती, दि. 10 (जिमाका): सहकार विभागामार्फत सरळसेवा पदभरती 2023 साठी गट-क संवर्गातील सरळसेवेच्या रिक्‍त पदे भरण्यासाठी दि. 6 जुलै 2023 रोजी प्रसिध्द करण्यात आलेल्या जाहिरातीनुसार दि. 14 ऑगस्ट 2023 व दि. 16 ऑगस्ट 2023 दरम्यान या पदासाठी ऑनलाईन परीक्षेचे आयोजन करण्यात आलेले आहे.

या परीक्षेचे प्रवेशपत्र उमेदवारांनी नोंदविलेल्या भ्रमणध्वनी क्रमांक व ई-मेल आयडीवर पाठविण्यात आलेले आहे. तसेच प्रवेशपत्र डाऊनलोड करावयाची लिंक आणि याबाबतची सूचना सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या http://sahakarayukta.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

            उमेदवारांनी या संकेतस्थळावरुन परीक्षेचे प्रवेशपत्र प्राप्त करावे आणि परीक्षेस येतांना त्याची रंगीत प्रत सोबत ठेवावी. तसेच प्रवेशपत्रात नमूद सूचनांचे उमेदवारांनी पालन करावे, असे आवाहन सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक शंकर कुंभार यांनी केले आहे.

*****

No comments:

Post a Comment

#अमरावती_विभाग_शिक्षक_मतदारसंघ_निवडणूक_2026 दिनांक 23 ऑक्टोबर, 2026 रोजी सकाळी 08.00 वा. ते दुपारी 16.00 वाजे पर्यंत झालेल्या अंतीम मतदानाची आकडेवारी

  # अमरावती _ विभाग _ शिक्षक _ मतदारसंघ _ निवडणूक _2026 दिनांक 23 ऑक्टोबर, 2026 रोजी सकाळी 08.00 वा. ते दुपारी 16.00 वाजे पर्यंत झालेल्या...