Friday, August 25, 2023

‘ईट राईट स्कुल’ उपक्रमातंर्गत पोषण आहार मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न

 


‘ईट राईट स्कुल उपक्रमातंर्गत पोषण आहार मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न

        अमरावती, दि. 25 : अन्न सुरक्षा व मानदे प्राधिकारणामार्फत ‘ईट राईट इंडीया’ उपक्रमाअंतर्गत विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यात ‘ईट राईट स्कुल’ हा उपक्रमातंर्गत मनीबाई गुजराती विद्यालय, अमरावती येथे कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी सर्व शासकीय, खाजगी शाळांच्या मुख्याध्यापकांना अन्न सुरक्षा पोषण आणि स्वच्छता याबाबत मुलांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.

मुलांमध्ये लहान वयातच चांगल्या सवयी लावणे आवश्यक असतात. अन्न  सुरक्षा व स्वच्छतेबाबत मुलांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी शाळा व महाविद्यालयात जनजागृती करणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने प्रत्येक शाळेना ईट राईट स्कुल मध्ये कशाप्रकारे नोंदणी करून प्रमाणपत्र शाळांनी घ्यावे याबाबत अन्न सुरक्षा अधिकारी एस. आर. सुरकर व ग.वा.गोरे यांनी मार्गदर्शन केले. तसेच ईट राईट स्कूल मध्ये जास्तीत जास्त शाळांनी सहभाग घेण्याबाबत आवाहन करण्यात आले.

00000


No comments:

Post a Comment

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #राज्यसरकार

  ‘ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ ’ #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #राज्यसरकार