Thursday, August 3, 2023

कृषी निविष्ठा विक्रेत्यांसाठी प्रशिक्षण अर्ज सादर करण्याची मुदत 10 ऑगस्टपर्यंत

 

कृषी निविष्ठा विक्रेत्यांसाठी प्रशिक्षण

अर्ज सादर करण्याची मुदत 10 ऑगस्टपर्यंत

 

           अमरावती, दि. 3 : जिल्ह्यातील कृषी निविष्ठा विक्रेत्यांसाठी डेसी (डिप्लोमा इन ॲग्रीकल्चर एक्सटेंशन सर्व्हीसेस फॉर इनपुट डीलर्स ) हा एक वर्ष कालावधीचा  प्रशिक्षण वर्ग प्राचार्य, प्रादेशिक कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था, रामेती, अमरावतीमार्फत चालविण्यात येणार आहे. तरी नव्याने कृषी निविष्ठा परवाना काढु इच्छिणाऱ्या प्रवेश पात्र उमेदवार तसेच परवाना असलेले पात्र उमेदवार यांनी दि. 10 ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन आत्मा प्रकल्प संचालक अर्चना निस्ताने यांनी केले आहे.

          प्रवेशासाठी पात्रता कमीतकमी 10 वी पास आवश्यक आहे. आवश्यक कागदपत्रांमध्ये इयत्ता दहावी किंवा बारावी पास प्रमाणपत्र व गुणपत्रक, आधार कार्ड, चार छायाचित्रे , कृषी निविष्ठा विक्रीचा परवाना आदी कागदपत्रे प्रवेशासाठी आवश्यक राहील. या प्रशिक्षण वर्गासाठी नव्याने परवाना काढू इच्छिणाऱ्या प्रवेश पात्र उमेदवारासाठी 20 हजार रुपये प्रवेश शुल्क आहे. तसेच कृषी निविष्ठा परवाना असलेले प्रवेश पात्र विक्रेत्यांसाठी 10 हजार रूपये प्रवेश शुल्क आहे. प्रवेश अर्ज मिळण्याचे ठिकाण प्रकल्प संचालक, आत्मा कार्यालय, विसावा कॉलनी, जुना बायपास रोड, अमरावती असा आहे. उमेदवारांनी अर्ज दोन प्रतीत सादर करावा. तसेच प्रवेश अर्ज http://www.manage.gov.in या वेबसाईटवरही उपलब्ध आहे.

 

00000

No comments:

Post a Comment

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #राज्यसरकार

  ‘ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ ’ #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #राज्यसरकार