Monday, November 20, 2023

मराठा-कुणबी, जात प्रमाणपत्रासाठी पात्र व्यक्तींनी जिल्हाधिकारी कार्यालयात 24 नोव्हेंबरपर्यंत पुरावे सादर करण्याचे आवाहन

 

मराठा-कुणबी, जात प्रमाणपत्रासाठी पात्र व्यक्तींनी

जिल्हाधिकारी कार्यालयात 24 नोव्हेंबरपर्यंत पुरावे सादर करण्याचे आवाहन

 

             अमरावती, दि. 20 (जिमाका):  मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्रासाठी पात्र  व्यक्तींकडून उपलब्ध असलेले कागदपत्रे, पुरावे मागविण्यात आले आहे. कागदपत्रे सादर करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय येथे विशेष कक्षाची स्थापन करण्यात आली आहे. जिल्ह्यातील पात्र नागरिकांनी विशेष कक्षात दि. 21 ते 24 नोव्हेंबर या कालावधीत पुरावे जमा करावेत, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. विवेक घोडके यांनी केले आहे.

 

 

            शासनाने मराठा समाजास मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र देण्याबाबतची कार्यपद्धती विहीत करण्यासाठी न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. त्यानुषंगाने, जिल्ह्यातील नागरिकांना त्यांच्याकडे उपलब्ध असलेले पुरावे, वंशावळी, शैक्षणिक व महसुली पुरावे, संस्थानिकांनी दिलेल्या सनदा, राष्ट्रीय दस्तावेज आदी जुनी अभिलेखे समितीस सादर केले जाणार आहेत. जिल्ह्यातील नागरिकांनी यासंदर्भात त्यांच्याकडे जुने अभिलेख उपलब्ध असल्यास त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील विशेष कक्षात कागदपत्रे, पुरावे जमा करावे.

00000

No comments:

Post a Comment

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #राज्यसरकार

  ‘ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ ’ #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #राज्यसरकार