Friday, November 3, 2023

जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रावर आज व उद्या विशेष शिबिर मतदान नोंदणी, दुरुस्ती वगळणीचे अर्ज भरुन घेणार

 


जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रावर आज व उद्या विशेष शिबिर

मतदान नोंदणी, दुरुस्ती वगळणीचे अर्ज भरुन घेणार

 

          अमरावती, दि. 3 (जिमाका): मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या निर्देशानुसार 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार विशेष संक्षिप्त पुर्नरिक्षण कार्यक्रमांतर्गत दि. 27 ऑक्टोबर 2023 रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. दि. 27 ऑक्टोबर 2023 ते दि. 9 डिसेंबर 2023 या कालावधीमध्ये नागरिकांकडून नवीन मतदार नोंदणी अर्ज (नमुना-6), मतदार यादीतील नाव वगळण्यासाठी किंवा मतदार यादीतील प्रस्तावित नोंदीबाबत आक्षेप (नमुना-7), विधानसभा मतदार संघामध्ये किंवा विधानसभा मतदारसंघाबाहेर स्थलांतरासाठी, मतदार यादीतील नोंदी अद्यावत करण्यासाठी, नमुना अर्ज क्र. (नमुना-8) अर्ज मागविण्यात येणार आहे. या कार्यक्रमांतर्गत अधिकाधिक नागरिकांनी त्यांची मतदार नोंदणी करून घेण्यासाठी विशेष शिबिरे आयोजित करण्याचे आयोगाने निर्देश दिले आहेत.

नागरिकांनी मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुर्नरिक्षण कार्यक्रम 2024 अंतर्गत उद्या दि. 4 नोव्हेंबर 2023 (शनिवार) व 5 नोव्हेंबर 2023 (रविवार), तसेच दि. 25 नोव्हेंबर 2023 (शनिवार) व दि. 26 नोव्हेंबर 2023 (रविवार) ह्या चार दिवशी अमरावती जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रावर विशेष शिबिरे आयोजित करण्यात येत आहेत. या शिबिरामध्ये मतदार केंद्रावर मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्याकडून नागरिकांची मतदार नोंदणी, दुरूस्ती व वगळणीचे अर्ज भरून घेण्यात येत आहे. तरी उपरोक्त चार दिवशी घेण्यात येत असलेल्या शिबिरामध्ये जास्तीत-जास्त नागरिकांनी नविन मतदार नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केले आहे. 

000000

No comments:

Post a Comment

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #राज्यसरकार

  ‘ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ ’ #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #राज्यसरकार