Friday, November 24, 2023

‘मिट द प्रेस’: अमरावती श्रमिक पत्रकार संघटनेला पालकमंत्र्यांची भेट

 





‘मिट द प्रेस’: अमरावती श्रमिक पत्रकार संघटनेला पालकमंत्र्यांची भेट

अमरावती, दि. 24 (जिमाका): राजापेठ येथील अमरावती श्रमिक पत्रकार भवनाला उच्‍च व तंत्र शिक्षण, वस्‍त्रोद्योग, संसदीय कार्य मंत्री, महाराष्‍ट्र राज्‍य तथा पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी आज सदिच्छा भेट दिली. भेटीदरम्यान त्यांनी श्रमिक पत्रकार संघटनेचे पदाधिकारी तसेच पत्रकार बांधवांशी संवाद साधला.

श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष गोपाल हरणे यांनी पालकमंत्री श्री. पाटील यांना शाल, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित केले. यावेळी खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार प्रवीण पोटे पाटील, मनपा स्थायी समितीचे माजी सभापती तुषार भारतीय, पत्रकार संघाचे मार्गदर्शक विलास मराठे, उपाध्यक्ष अमोल इंगोले, कोषाध्यक्ष तथा संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे सिनेट सदस्य गिरीश शेरेकर, सचिव रवींद्र लाखोडे, कार्यकारिणी सदस्य कृष्णा लोखंडे, प्रवीण कपिले आदी सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

0000


No comments:

Post a Comment

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #राज्यसरकार

  ‘ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ ’ #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #राज्यसरकार