Saturday, November 25, 2023

आदिवासी युवकांना स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षणासाठी 29 नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागविले

 

आदिवासी युवकांना स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षणासाठी 29 नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागविले

 

अमरावती, दि. 25 (जिमाका) : आदिवासी सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, परतवाडा मार्फत शासनाव्दारे घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षेसाठी विनामुल्य प्रशिक्षण देण्यात येते. प्रशिक्षणासाठी उमेदवार निवडीसाठी दि. 30 नोव्हेंबर रोजी मुलाखत आयोजित करण्यात आली असून इच्छुक उमेदवारांनी बुधवार दि. 29 नोव्हेंबरपर्यंत अर्ज सादर करावे, असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी वैशाली पवार  यांनी केले आहे. 

 

 

प्रशिक्षण कालावधी हा दि. 1 डिसेंबर ते 15 मार्च 2024 पर्यंत साडेतीन महिन्यांचा असून या कालावधीत प्रशिक्षणार्थींना दरमहा एक हजार रुपये विद्यावेतन देण्यात येते. प्रशिक्षण यशस्विरित्या पूर्ण केल्यानंतर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी विविध विषयांच्या चार पुस्तकांचा संच विनामूल्य देण्यात येतो. या प्रशिक्षणासाठी उमेदवार हा आदिवासी प्रवर्गातील हवा. उमेदवाराचे वय 29 नोव्हेंबर 2023 रोजी किमान 18 वर्षे पूर्ण असावे. उमेदवार किमान दहावीची परीक्षा उत्तीर्ण केलेला असावा. उमेदवराचे नाव जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद येथे नोंदणी केलेली असावी. इच्छुक उमेदवारांनी दि. 29 नोव्हेंबर 2023 पर्यंत अर्ज सादर करावा. तसेच अर्ज केलेल्या उमेदवारांच्या निवडीसाठी  गुरुवार दि. 30 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजता कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, माहिती व मार्गदर्शन केंद्र, अचलपूर, कॅम्प परवाडा जि. अमरावती  येथे मुलाखतीसाठी मुळ कागदपत्रासह उपस्थित राहावे. निवड यादी त्याचदिवशी सायंकाळी 5 वाजता कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात येईल.

 

अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक 07223-221205 तसेच भ्रमणध्वनी क्रमांक 7709432024 येथे संपर्क साधावा. अर्जासोबत शाळा सोडल्याचा दाखला, दहावी उत्तीर्णची गुणपत्रिका, उपविभागीय अधिकारी यांनी दिलेले जातीचे प्रमाणपत्र, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे ऑनलाईन कार्ड, प्रकल्प अधिकारी आदिवासी विकास कार्यालयात नाव नोंदविल्याचे नोंदणी कार्ड इत्यादी आवश्यक प्रमाणपत्राच्या साक्षांकित प्रती व अलीकडच्या काळातील छायाचित्र जोडणे आवश्यक आहे. यापूर्वी प्रशिक्षण घेतलेल्या उमेदवारांनी पुन्हा अर्ज करु नये.

00000

No comments:

Post a Comment

बँकांनी उद्योगांना कर्जवाटप करताना सकारात्मक रहावे - जिल्हाधिकारी आशिष येरेकर

बँकांनी उद्योगांना कर्जवाटप करताना सकारात्मक रहावे    - जिल्हाधिकारी आशिष येरेकर *उद्दिष्ट प...