Official Blogger Account of District Information Office, Amravati DGIPR, Government of Maharashtra
Tuesday, November 21, 2023
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत 30 नोव्हेंबरला मेळाव्याचे आयोजन
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत
30 नोव्हेंबरला मेळाव्याचे आयोजन
अमरावती, दि. 21 (जिमाका): साहित्यरत्न
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण
संस्था पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने महामंडळामार्फत शासनाच्या विविध योजनाची प्रचार
व प्रसार व्हावा यासाठी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा गुरुवार दि.
30 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, समाज
कल्याण कार्यालय अमरावती येथे होणार आहे. विविध योजनाची माहिती व लाभ घेण्यासाठी मेळाव्याला
उपस्थित राहावे, असे आवाहन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे
प्रादेशिक व्यवस्थापक अ.ब. साळुंके यांनी केले.
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत
मांग, मातंग, मिनीमादींग, मादींग, दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधेमांग,
मांग, गारुडी, मांग गारोडी मादगी व मादिगा या जातीतील समाज बांधवासाठी विविध योजना
राबविण्यात येतात. या योजनाचा लाभ समाज बांधवाना व्हावा यासाठी मेळावाचे आयोजन
करण्यात आले आहे. या मेळाव्याला प्रमुख पाहुणे मंडळाचे व्यवस्थापकिय संचालक मनिष
सांगळे, कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थाचे महासंचालक सुनिल वारे
महाव्यवस्थापक अनिल मस्के उपस्थित राहणार
आहे.
000000
Subscribe to:
Post Comments (Atom)
‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #राज्यसरकार
‘ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ ’ #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #राज्यसरकार
-
पालकमंत्र्यांनी घेतला जिल्हा नियोजन समितीचा आढावा; 679 कोटी मंजूर निधीच्या कामांचे प्रस्ताव तात्काळ सादर करा - पालकमंत्री चंद...
-
ग्रामीण भागात कलम 37(1) व (3) लागू अमरावती, दि. 7 (जिमाका) : जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासा...
-
महसूल दिनी एक लाख वृक्षारोपण होणार *आजपासून महसूल सप्ताहाचे आयोजन; विविध कार्यक्रमांची रेलचेल अमरावती, दि. ३१ : महसूल दिनाच्या निमित्ताने १ ...
No comments:
Post a Comment