Tuesday, November 28, 2023

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत महाडीबीटी प्रणालीवर निवड झालेल्या लाभार्थ्यांनी कागदपत्रे अपलोड करा

 एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत महाडीबीटी प्रणालीवर

निवड झालेल्या लाभार्थ्यांनी कागदपत्रे अपलोड करा

 

            अमरावती, दि. 28 (जिमाका): एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान व राष्ट्रीय कृषि विकास योजने अंतर्गत महाडीबीटी पोर्टलवर 14 व्या लॉटरी सायकलमध्ये मोठ्या संख्येने लाभार्थी निवड झालेली आहे. निवड झालेल्या लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रे अपलोड करण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी राहूल सातपुते यांनी केले आहे.  

 

            जिल्ह्यात फलोत्पादन व भाजीपाला पिकांचे क्षेत्र व उत्पादन वाढविण्यासाठी  एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान व राष्ट्रीय कृषि विकास योजना राबविण्यात येत आहे. फलोत्पादन पिकाचा संशोधन तंत्रज्ञान, प्रसार, काढणीत्तोर व्यवस्थापन तंत्रज्ञान, प्रक्रीया व पणन सुविधा यांच्या माध्यमातुन समुह पध्दतीने सर्वागीण विकास करणे तसेच शेतकऱ्यांचे आर्थिक राहणीमान उंचावणे पारंपारिक उत्पादन पध्दतीचे आधुनिक शास्त्रीय ज्ञानाची सांगड घालुन तंत्रज्ञानाचा विकास व प्रसार आणि प्रचार करणे आदी या योजनेचे उदिष्टे आहे.

 

            एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत 14 व्या लॉटरी सायकलमध्ये महाडीबीटी प्रणालीवर मोठ्या संख्येने लाभार्थी निवड झालेली आहे. या नव्याने निवडलेल्या लाभार्थीने नजीकच्या सीएससी सेंटर तसेच संबंधित तालुका कृषि अधिकारी कार्यालयातील क्षेत्रीय अधिकारी, कर्मचारी यांना प्रत्यक्ष संपर्क साधावा आणि आपले आवश्यक कागदपत्रे तात्काळ अपलोड करून घ्यावीत. या योजनेंतर्गत सर्वसाधारण, अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीच्या प्रवर्गातील एकूण 1 हजार 900 शेतकऱ्यांचे विविध घटकासाठी निवड झालेली आहे. यात प्रामुख्याने क्षेत्र विस्तार व पुनरूज्जीवन, पॅक हाऊस, कांदाचाळ, शेडनेट हाऊस, प्लॉस्टीक मलचींग इत्यादी मोठ्या संख्येने लाभार्थी निवड झालेली आहे. तरी नविन निवड झालेल्या लाभार्थीनी आपली आवश्यक कागदपत्रे अपलोड करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

00000

No comments:

Post a Comment

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #राज्यसरकार

  ‘ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ ’ #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #राज्यसरकार